मंगरूळपीर आगारातून पूर्व मंगरूळपीर, धानोरा, चेहेल, जनुना, कोठारी, कवठळ, कुपटा, गिंभा, बोरव्हा अशी बसफेरी सुरू होती. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतील या परतीच्या बसफेरीमुळे उपरोक्त गावांतील हजारो ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. तथापि, दोन वर्षांपूर्वी मंगरूळपीर-कवठळ-दारव्हा या मार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने ही बसफेरी बंद करण्यात आली. आता या मार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. तथापि, अद्यापही मंगरूळपीर आगाराकडून ही बस सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे उपरोक्त गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनचालक नियमांचे पालन करीत नसल्याने अपघाताची भीती असते. त्यामुळे मंगरूळपीर-कवठळ ही बसफेरी सुरू करण्याच्या मागणीसाठी पं.स. सदस्य विलास गायकवाड यांच्या नेतृत्वात २५ पेक्षा अधिक ग्रामस्थांनी मंगरूळपीरच्या आगारप्रमुखांना निवेदन दिले.
मंगरूळपीर-कवठळ बसफेरीसाठी आगारप्रमुखांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:44 AM