शासनाच्या आदेशानंतरही झाले नाही माध्यमिक शिक्षकांचे पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:17 PM2019-08-06T14:17:04+5:302019-08-06T14:17:12+5:30

५ आॅगस्ट उलटूनही वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना गत महिन्याचा पगार अद्यापपर्यंत मिळाला नाही.

Despite the government's order, the salary of secondary teachers was not done | शासनाच्या आदेशानंतरही झाले नाही माध्यमिक शिक्षकांचे पगार

शासनाच्या आदेशानंतरही झाले नाही माध्यमिक शिक्षकांचे पगार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपर्यंत व्हायलाच हवे, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी रामदास धुमाळ यांनी शिक्षण संचालकांना दिले; मात्र ५ आॅगस्ट उलटूनही वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना गत महिन्याचा पगार अद्यापपर्यंत मिळाला नाही. यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. 
यासंदर्भातील पत्रात कक्ष अधिकाºयांनी नमूद केले आहे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करण्याच्या सूचना यापुर्वीच निर्गमित करण्यात आल्या आहेत; मात्र त्याचे पालन होत नसून वेतनास विलंब होत असल्याच्या तक्रारी शिक्षक संघटनांकडून होत आहेत. दरम्यान, १३ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशा सूचना कक्ष अधिकाºयांनी शिक्षण संचालकांना दिल्या. याचे पालन न करणाºया शाळा, संबंधित यंत्रणा, अधिकाºयांविरूद्ध कारवाई प्रस्तावित करावी. १२ आॅगस्ट २०१९ रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद या सणानिमित्त जुलै २०१९ चे वेतन ५ आॅगस्ट पर्यंत करावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या; परंतु ६ आॅगस्ट उलटूनही वेतन न मिळाल्याने माध्यमिक शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: Despite the government's order, the salary of secondary teachers was not done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.