यावेळी वेतन पथक अधीक्षक इंगोले यांची उपस्थिती होती. भविष्य निर्वाह निधी हिशोब पावत्या व डी.सी.पी. एस.पावत्या हिशोब सद्य:स्थिती, भविष्य निर्वाह निधी परतावा, ना परतावा या बद्दल सद्य:स्थिती, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची सद्य:स्थिती प्राप्त व निकाली प्रकरणे किती, खाजगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिक शाळा, आदिवासी उपाययोजन क्षेत्रातील शाळेतील वेतनाची सद्य:स्थिती, जिल्ह्यातील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीकरिता प्राप्त प्रस्ताव निकाली काढण्याबाबत व प्रलंबित असल्यास कारणे कोणती, जुलै २०२१ साठी वेतन सीएमपी प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत, डी.सी.पी.एस./ एन.पी.एस खाते क्रमांकाबाबत, तसेच कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता मिळालेले कर्मचारी, हप्ता न मिळालेले कर्मचारी किती, न मिळण्याची कारणे कोणती, याबाबत निधी नसल्यास पाठपुराव्याबाबत माहिती घेण्यात आली. अंशत: अनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाची सद्य:स्थिती, तसेच शालार्थ आय.डी.संदर्भात सद्य:स्थिती यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष प्रशांत कव्हर, जिल्हा कार्याध्यक्ष विजय भड, प्रवीण कदम, देवीदास शिंदे, दिनेश मगर, विनोद नरवाडे, प्रथमेश उमक पाटील, भाजप शिक्षक सेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रणव बोलवार, भाजप शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष महेश उगले, उपाध्यक्ष गजानन वारकड आदी उपस्थित होते.
-------------------------जुनी पेन्शन योजनेबाबत चर्चा
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती प्रपत्र १ व प्रपत्र २ नुसार शिक्षण संचालनालय, पुणे येथे पाठविण्यात आली असल्यास एकूण किती शाळेतील कर्मचारी जुनी पेन्शनच्या लाभापासून वंचित आहेत यावर चर्चा करण्यात आली, तसेच माहिती घेण्यात आली. जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे जीपीएफ/डीसीपीएस यासंदर्भात ऑनलाइनप्रणालीद्वारे कार्यवाही करणे यावरही चर्चा झाली.