ग्रामपंचायतींच्यावतीने जंतुनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:28 AM2021-06-17T04:28:06+5:302021-06-17T04:28:06+5:30

00 मालेगाव येथे ज्येष्ठांचे लसीकरण वाशिम : मालेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय ४५ वर्षांपेक्षा ...

Disinfectant spraying on behalf of Gram Panchayat | ग्रामपंचायतींच्यावतीने जंतुनाशक फवारणी

ग्रामपंचायतींच्यावतीने जंतुनाशक फवारणी

Next

00

मालेगाव येथे ज्येष्ठांचे लसीकरण

वाशिम : मालेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनाही कोरोना लस दिली जात असून, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे.

0000

प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया अद्याप प्रतीक्षेतच आहे. बिंदूनामावलीत पदोन्नती अडकल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्रुटीची पूर्तता करावी, अशी मागणी होत आहे.

०००००००००

रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी

वाशिम : मुंगळा, राजुरा परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने दुरुस्तीची कामे हाती घेऊन रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

00

पार्डी टकमोर परिसरात ट्रॅक्टरद्वारे पेरणी (फोटो)

वाशिम : वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर परिसरात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्याला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येते. गत पाच दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. यंदाही परिसरात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक होणार आहे.

००००

शासकीय समित्यांचे गठण केव्हा?

वाशिम : दोन वर्षांचा कालावधी होत असतानाही, जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना यासह तालुकास्तरावर विविध समित्या स्थापन अद्याप झाल्या नाही. या समित्यांची स्थापना केव्हा होणार, याकडे लाभार्थींसह राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Disinfectant spraying on behalf of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.