दवाखाने हाउसफुल्ल, प्रशासन कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:44+5:302021-09-22T04:45:44+5:30
जुलै, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात या रोगांचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये लहान मुलांचा जास्त समावेश आहे. ...
जुलै, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात या रोगांचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये लहान मुलांचा जास्त समावेश आहे. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू यामुळे लहान मुलांना याचा अधिक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सावधान राहण्याचे आवाहन वैद्यकीय व नगरपालिका विभागाकडून केले जात आहे. हवामानात लागोपाठ होत असलेला बदल यास कारणीभूत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवणे व खाण्यापिण्यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे सूतोवाच केले जात आहे. नगरपालिकेकडून मच्छरांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वतोपरी उपाय केले जात आहेत. स्वच्छतेबाबत नगरपालिका अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याचे नगराध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी सांगितले.
...
लहान मुलांना बाहेरचे खाणे-पिणे देऊ नये, पाणी उकळून द्यावे व काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना आवश्य दाखवावे.
- प्रताप ढवळे,
बालरोग चिकित्सक, रिसोड
घरात किंवा आपल्या आसपास परिसरात टायर, डबे आदी कोणत्याही भांड्यात पाणी जमा होऊ देऊ नये. स्वच्छतेकडे लक्ष ठेवणे व खाण्यापिण्यात हिरवा भाजीपाला जास्त प्रमाणात सेवन करावा.
- डाॅ. माधव मस्के,
बालरोग चिकित्सक
रिसोड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबाबत अतिदक्षता घेण्यात येत आहे. फॉगिंग मशीनद्वारे मच्छरांचा बंदोबस्त लावण्यात येत आहे, तर औषधाची फवारणी करून अन्य बिमारी परवापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- नारायण गायकवाड,
आरोग्य सभापती, न. प. रिसोड