शिरपूर जैन: नजीकच्या गौळखेडा शेत शिवारातील मनोहर चंद्रभान साबळे व त्यांच्या दोन भावाच्या शेतातील सोयाबीन गंजीला आग लावल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर पोलीस स्टेशन पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरखेडा शेतशिवारात मनोहर साबळे, गजानन साबळे, गौतम साबळे यांची साडेपाच एकर शेती आहे. या शेतीतील सोयाबीनची सोंगणी करून शेतामध्ये गंजी लावण्यात आली होती. गावातील अशोक बळीराम इंगळे अमोल, अमोल अनंता साबळे रत्न उत्तम साबळे, अमोल भास्कर चंद्रशेखर हे २८ ऑक्टोबर रोजी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. त्यांना खेकडे मिळाले नाहीत. म्हणून त्यांनी रागाच्या भरात मनोहर साबळे व त्याच्या दोन भावाच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. यामध्ये तिघा भावांचे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मनोहर साबळे यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त चार आरोपी विरुद्ध कलम ४३५ ४२७ ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(वार्ताहर)
विकृत मानसिकता: खेकडे मिळाले नाही म्हणून लावली शेतातील सोयाबीनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:16 PM
Washim News रागाच्या भरात मनोहर साबळे व त्याच्या दोन भावाच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली.
ठळक मुद्देमनोहर साबळे व त्याच्या दोन भावाच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली.यामध्ये १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.