शेती शाळा समन्वयक, शेती शाळा प्रशिक्षकांचे जिल्हास्तर उजळणी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:15+5:302021-07-16T04:28:15+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी डी. के. चौधरी, तर उद्घाटक म्हणून प्रकल्प विशेषज्ञ (कृषी) मिलिंद अरगडे उपस्थित होते. मंचावर ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी डी. के. चौधरी, तर उद्घाटक म्हणून प्रकल्प विशेषज्ञ (कृषी) मिलिंद अरगडे उपस्थित होते. मंचावर विदाताचे नोडल अधिकारी एस. के. देशमुख कृषी महाविद्यालय, रिसोडचे प्रा. एस. बी. खोडके, शेती शाळा समन्वयक आर. एस. घुले व प्रकल्प विशेषज्ज्ञ (मनुष्य बळ विकास) विश्वजित पाथरकर, आर. ए. खिल्लारी (प्रकल्प सहायक उपविभाग) प्रामुख्याने उपस्थित होते. एस. के. देशमुख यांनी प्रशिक्षणाचे उद्देश व पीक परिस्थितीनुसार आवश्यक तंत्राबाबत उपलब्ध तज्ज्ञ मंडळींची माहिती दिली. डी. के. चौधरी यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून शिफारसीत कीटकनाशके वापर व हाताळणी तसेच हवामानाचा अचूक अंदाज पोहोचविण्याचे आवाहन केले. मिलिंद आरगडे यांनी शेतीशाळा समन्वयक, प्रशिक्षकांच्या भूमिका व जबाबदाऱ्यांविषयी सादरीकरण केले. एकात्मिक कीड व्यवस्थापन, सुधारित वाणांच्या वापराबाबत कृषी विज्ञान केंद्रातील आर. ए. आंबेनगरे, तर सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर व बीज प्रक्रिया याविषयी कृषी महाविद्यालय येथील प्रा. एस. बी. खोडके यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. एस. आर. टी. तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण करून शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पीक उत्पादनाचे कमी खर्चाचे लागवड तंत्र बांधावर पोहोचवावे, असे आवाहन केले.
-----------
ऑनलाईन अॅप वापराबाबत मार्गदर्शन
विश्वजित पाथरकर यांनी शेतीशाळा अॅपबाबत उपस्थित प्रशिक्षणार्थींना माहिती देऊन अॅपचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. शेतीशाळा समन्वयक आर. एस. घुले यांनी शेतीशाळेत सर्वेक्षण व निरीक्षणाचे महत्त्व व नोंदीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रानंतर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षणानंतर वनोजा फार्म येथील एसआरटी प्लॉटची पाहणी करण्यात आली. प्रशिक्षणास जिल्ह्यातील शेतीशाळा प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजित पाथरकर, तर आभार अभिषेक देशमुख यांनी मानले.