शेततळ्यांच्या कामांची सखोल चौकशी करा! - ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:08 PM2018-06-12T14:08:44+5:302018-06-12T14:08:44+5:30
आसेगाव (वाशिम) : नजिकच असलेल्या मोतसावंगा, इचोरी आणि रामगड या तीन गावांमध्ये तयार करण्यात आलेल्या गावतलावांची कामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत. ही बाब लक्षात घेवून सदर कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मंगरूळपीर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली.

निवेदनात पुढे नमूद आहे, की खरीप हंगाम उलटल्यानंतर पिकांना पाण्याची गरज भासल्यास शेतकºयांना शेततळ्यांमधील पाण्याचा उपयोग व्हावा, या हेतूने शासनाकडून गावोगावी शेततळे तयार करण्यासाठी भरीव अनुदान दिले जात आहे. त्यानुसार, मोतसावंगा, इचोरी आणि रामगड या तीन गावांमध्येही चालूवर्षी मोठ्या स्वरूपातील शेततळे खोदण्यात आले. मात्र, यात गैरप्रकार झाल्याने कामे बोगस झाली आहेत. त्यामुळे शेततळ्यांचा मूळ उद्देश साध्य होणार नाही. ही बाब लक्षात घेवून या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर समाजसेवक दिनेश किसन चव्हाण यांच्यासह इतरांच्या स्वाक्षºया आहेत.