चायनिज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:39+5:302021-09-22T04:45:39+5:30
वाशिम : चायनीज गाडी पाहून तुमच्या जिभेला पाणी सुटत असेल तर सावधान. कारण यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे आरोग्यावर दीर्घकालीन ...
वाशिम : चायनीज गाडी पाहून तुमच्या जिभेला पाणी सुटत असेल तर सावधान. कारण यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे चायनिज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय? असा प्रश्न उपस्थित होत असून, वेळीच दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
चायनीज गाड्यांवर वाढणारी गर्दी पाहून, फास्टफूड व चायनीज पदार्थांवर लोक तुटून का पडतात? असा प्रश्न अनेक जणांना पडतो. या पदार्थांमध्ये ‘अजिनोमोटो’ रसायन मिसळविले जाते. यामुळे जिभेवर रेंगाळणारी चव उच्च पातळीवर पोहोचवून पदार्थांच्या व्यसनात ओढणारं हे छोटंसं रसायन नागरिकांना भुरळ घालते. या रसायनामुळे मेंदूच्या पेशी म्हणजेच ‘न्यूरॉन्स’ला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोटाच्या विकारांबरोबरच वजन वाढणे, मधुमेह यांसारख्या आजारालाही निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे चायनिज पदार्थांची चव चाखण्यापूर्वी आरोग्याचा विचारही करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
......................
काय आहे अजिनोमोटो?
अजिनोमोटो याचं खरं नाव आहे ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’. पांढऱ्या शुभ्र रंगाचं हे रसायन साखर व मिठासारखंच दिसणारं आणि सर्वांना आवडणारं आहे. याचा उपयोग अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. वेगवेगळे सॉस, रेडिमेड चटणी, पिज्झा, बर्गर, कुरकुरे, चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटोचा वापर केला जातो.
...............
... म्हणून चायनिज खाणे टाळा
चायनिज पदार्थ्यांच्या अतिसेवनामुळे बद्धकोष्टता, ॲसिडीटी, आतड्यांशी संबंधित विविध आजार उद्भवू शकतात. अतिसेवनाने कॅन्सरही होऊ शकतो, अशी शक्यताही काही संशोधनातून वर्तविण्यात येते. संभाव्य आजार टाळण्यासाठी चायनिज खाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
...
.. तर कॅन्सरही होऊ शकतो
कोट
चायनिज पदार्थांच्या अतिसेवनामुळे बद्धकोष्टता, आतड्याशी संबंधित आजार होऊ शकतात. याशिवाय अतिसेवन हे काही अंशी कॅन्सर होण्यालादेखील कारणीभूत ठरू शकण्याची शक्यता वर्तविली जाते.
- डॉ. अनिल कड
पोटविकार तज्ज्ञ, वाशिम.