कोरोनाची लक्षणे लपवू नका, तातडीने चाचणी करून घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:33+5:302021-03-04T05:18:33+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, आरोग्य विभागाचे नियोजन यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, आरोग्य विभागाचे नियोजन यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी सोमवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. वाशिम शहरातील सिव्हिल लाइन येथील अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, रिसोड तालुक्यातील सवड येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह व कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, या ठिकाणीसुद्धा कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. कोरोना संसर्गाचे निदान व उपचार लवकर झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते. सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाविषयक लक्षणे आढळून येताच नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, कोणताही आजार लपवू नये, असे आवाहनही डॉ. राठोड यांनी केले.