वाहनचालकांची तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:42+5:302021-05-19T04:42:42+5:30
०० समन्वयाने काम करण्याच्या सूचना ! वाशिम : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, ...
००
समन्वयाने काम करण्याच्या सूचना !
वाशिम : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने मंगळवारी केल्या.
००
हिवरा येथे चार कोरोना रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील हिवरापेन येथील चारजणांचा कोरोना चाचणी अहवाल १८ मे रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची आरोग्य विभागाने तपासणी केली.
०००
३४ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई
वाशिम : रिसोड-वाशिम मार्गावरील मोहजा, रिठद, वांगी परिसरात मोहीम राबवून वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चमूने १७ व १८ मे रोजी ३४ चालकांवर कारवाई केली.
००००
देयके रखडली !
वाशिम : बांधकाम तसेच पाणीपुरवठा, सिंचनसंदर्भात कामे करूनही देयके रखडली. देयके अदा करण्याची मागणी कंत्राटदार संघटनेने मंगळवारी केली. विहीत मुदतीत काम केल्यानंतरही देयके मिळत नसल्याने कंत्राटदार संघटनेमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
०००
हराळ येथे आरोग्य तपासणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल १८ मे रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
०००
बालविवाहाची माहिती देण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची करडी नजर आहे. त्यानुषंगाने आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असून, कुठे बालविवाह होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागाने केले.
००००
ज्येष्ठांनी तातडीने चाचणी करावी !
वाशिम : जोखीम गटातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण लवकर होते. त्यामुळे लक्षणे असल्यास त्यांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वाशिमचे तहसीलदार विजय साळवे यांनी मंगळवारी केले आहे.
000000
रिक्त पदांमुळे कामकाजाचा खोळंबा
वाशिम : जि. प. बांधकाम विभाग, पंचायत विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे होण्यास विलंब लागत आहे. अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी स्वप्निल सरनाईक यांनी सोमवारी केली.
000000000000000000
बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : कडक निर्बंधामधून किराणा, भाजीपाला, आदींना सूट मिळाली आहे. सूट मिळताच मालेगावच्या बाजारपेठेत सकाळच्या सुमारास फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे मंगळवारी दिसून आले.
०००
वनोजा येथे आणखी चार कोरोना रुग्ण
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथे आणखी चार कोरोना रुग्ण १८ मे रोजी आढळून आले. वनोजा येथे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००
करडा परिसरात वीजपुरवठा खंडित
वाशिम : रिसोड तालुक्यातील करडा परिसरातील काही गावांत अजूनही वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी मंगळवारी केली आहे.
०००००००००