पीककर्जाच्या विलंबामुळे वनोजा येथील शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:47 PM2018-06-15T14:47:36+5:302018-06-15T14:47:36+5:30
वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी ऐन खरीप पेरणीच्या वेळेत हवालदिल झाले आहे. या संदर्भात शेतकºयांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत बँकाना पीककर्ज देण्याबाबत सुचित करण्याची मागणी करणारे निवेदनच सादर केले आहे.
ंयंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी उसणवारी करून घाईत पेरणी उरकली असली तरी, अद्याप ७० टक्के शेतकरी पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. बियाणे, खतांसाठी पैसा नसल्याने त्यांच्याकडून बँंकांकडे पीककर्जाची मागणीही केली आहे. यामध्ये नागपूर-मुंबई महामार्गासाठी जमीन देणाºया वनोजा येथील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. आता खरीपाच्या पेरणीसाठी बँंकांना पीककर्ज तातडीने वितरित करण्याचे आदेश असतानाही त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसीच्या कायद्यानुसार २०१६-१७ च्या कर्जाची फेड केली. त्यांना नव्याने कर्ज देणे क्रमप्राप्त असतानाही बँका वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे कारण पुढे करीत शेतकºयांना वेठीस धरीत आहेत. या प्रकारामुळे वनोजा येथील शेतकरी हताश झाले असून, त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपली समस्या जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे मांडली आहे. पीककर्ज देण्यासाठी बँकांना सुचित करावे, अशी मागणी त्यांनी केली असून, याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. या निवेदनावर वनोजा येथील ५० शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.