लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) - गेल्या १२ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती असून, शेतकºयांची झोप उडाली आहे.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ९० टक्के शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. जुलै महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. गेल्या १२ दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी चिंतातूर असून दुबार पेरणीचे संकट समोर आहे तर दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. जुलै महिन्याचे पंधरा दिवस लोटले आहे तरी आसेगाव बांध धरण कोरडे आहे. साधारणत: १५ जुलैपर्यंत धरणात ६० ते ७० टक्के जलसाठा असतो. यावर्षी धरणात ठणठणाट आहे. दरवर्षी १५ जुलैपर्यंत दुधडी भरून वाहणारी शिवनी नांदगाव जवळ असलेली भोपळपेंड नदी यावेळी कोरडी पडली आहे. आसेगाव परिसरात पाऊस नसल्याने सर्व तलाव, बंधारे कोरडेठण आहे. या भागात जलसंधारणाची कामे झाली. मात्र पावसाचा अद्याप थांगपत्ता नाही. यामुळे बिजांकूर कोमेजून जात आहेत. सध्या परिसरातील शिवणी, नांदगाव, चिंचोली सनगाव, पिपंळगाव येथे पावसाळ्यातही तिव्र पाणी टंचाई जाणवत आहे.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 2:13 PM