संतोष वानखडेवाशिम, दि. २0 - खासगी शाळांच्या बरोबरीत जिल्हा परिषदेच्या शाळा आणण्यासाठी शिक्षक व शिक्षण विभागाने पुढाकार घेतल्याने ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांंना 'अच्छे दिन' नजरेत पडत आहेत. रिसोड तालुक्यातील धोडप जिल्हा परिषद शाळेने कृतीतून शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांंच्या डोक्यांवर माहितीदर्शक टोपी घातल्या आहेत. याबरोबरच कृतीयुक्त शैक्षणिक साहित्यांचा वापर केल्याने यावर्षी कॉन्व्हेंटमधून तब्बल १६ विद्यार्थी धोडपच्या जिल्हा परिषद शाळेत परतले आहेत.धोडप जिल्हा परिषद शाळेत वर्ग एक ते सातची सुविधा असून, विद्यार्थी संख्या २0७ अशी आहे. येथे मुख्याध्यापकांसह सात शिक्षक आहे. गत वर्षापासून मनोरंजनात्मक व कृतीयुक्त शिक्षण, ज्ञानरचनावाद आदी उपक्रम राबविले जात आहेत. याहीपलिकडे जाऊन धोडप येथील जिल्हा परिषद शाळेने डेक्स-बेन्च तसेच टोपींवर विविध प्रकारची माहिती लिहून विद्यार्थ्यांंना कृतीतून शिक्षण देण्याला प्रारंभ केला आहे. एखाद्या विषयातील सविस्तर माहिती त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांंंच्या टोपीवर लिहिली जाते. वर्ग तिसरीतील विद्यार्थ्यांंच्या टोपीवर देशातील सर्व नद्यांची नावे लिहिण्यात आली आहेत. याप्रमाणे जिल्ह्यातील तालुके, राज्यातील जिल्हयांची नावे लिहिण्यात आली आहेत. सदर माहिती विद्यार्थ्यांंंच्या नजरेत दररोज पडत असल्याने विद्यार्थ्यांंंची ह्यघोकमपट्टीह्ण आपसूकच कमी होईल, असा विश्वास शिक्षक व्यक्त करीत आहेत. या शाळेत बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थी बचत बँक सुरू केली आहे. दत्तक पालक योजनेंतर्गत सात शिक्षकांनी सात विद्यार्थी दत्तक घेतले असून, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. शाळेच्या भिंतीवर विविध प्रकारची माहिती लिहून भिंतीही बोलक्या बनविल्या आहेत. विद्यार्थ्यांंंमध्ये ह्यस्टेज डेअरिंगह्ण आणण्यासाठी वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल ेजाते. विविध प्रकारच्या उपक्रमामुळे आणि शाळेचे पालटलेले रुपडे पाहून १६ विद्यार्थी कॉन्व्हेंटमधून पुन्हा या जिल्हा परिषद शाळेत परतले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक गुलाबराव आवले, दिलीप पंडीत, कैलास मानवतकर, सुभाष कसाब, सुरेश रंजवे, महादेव जायभाये, श्रीनिवास कडेकर यांनी या विशेष उपक्रमांसाठी पुढाकार घेऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला.
कृतीतून विद्यार्थ्यांंना शिक्षण; टोपींचा वापर
By admin | Published: September 21, 2016 2:17 AM