वाशिम: डिजिटल सातबारा प्रक्रियेत सुरुवातीला माघारलेल्या जिल्ह्याने कामगिरीत सुधारणा के ली असून, जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४७ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तयार झाले आहेत.राज्य शासनाच्यावतीने सध्या राज्यात जिथे तिथे आॅनलाईन सात-बारा उतारा मागितला जात असला तरी शेतकºयांसाठी आॅनलाईन सातबारा उतारा मिळवणे ही मोठी जिकीरीची बाब आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट स्पीड, वीज अशा सुविधांचा अभाव आहे. त्यातही आॅनलाईन सात-बारा उताºयाची प्रिंट मिळाली तरी तो आहे तसा बँक किंवा कोर्टाच्या कामकाजात आहे तसा वापरता येत नाही. त्यावर पुन्हा तलाठ्याचा सहीशिक्का आवश्यक असतो. त्यासाठी पुन्हा तलाठ्यांकडे जावे लागते. एकूणच आॅनलाईन सात-बारा उतारा हा सोईपेक्षा अडचण जास्त असला तरी अनेक ठिकाणी आॅनलाईन सात-बारा सक्तीचा करण्यात आला आहे. शेतकºयांच्या या अडचणीवर उपाय म्हणून आता तलाठ्याची डिजीटल स्वाक्षरी असलेला सात-बारा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा दस्तऐवज महाभूलेख संकेतस्थळावर उपलब्धही करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी करण्यात येत असून, सुरुवातीला अमरावती विभागात शेवटच्या स्थानावर असलेल्या वाशिम जिल्हा प्रशासनाने कामगिरीत सुधारणा करून ४७ टक्के काम पूर्ण केले आहे. दरम्यान, काही तांत्रिक अडचणींमुळे या कामात खोळंबा निर्माण होऊन तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोड करणे कठीण झाले आहे. तथापि, तलाठ्यांचे काम मात्र सुरूच आहे.
डिजिटल सातबारात वाशिम जिल्ह्याची प्रभावी कामगिरी ; ४७ टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 3:28 PM
वाशिम: डिजिटल सातबारा प्रक्रियेत सुरुवातीला माघारलेल्या जिल्ह्याने कामगिरीत सुधारणा के ली असून, जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४७ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तयार झाले आहेत.
ठळक मुद्दे आॅनलाईन सात-बारा उतारा हा सोईपेक्षा अडचण जास्त असला तरी अनेक ठिकाणी आॅनलाईन सात-बारा सक्तीचा करण्यात आला आहे. या अडचणीवर उपाय म्हणून आता तलाठ्याची डिजीटल स्वाक्षरी असलेला सात-बारा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विभागात शेवटच्या स्थानावर असलेल्या वाशिम जिल्हा प्रशासनाने कामगिरीत सुधारणा करून ४७ टक्के काम पूर्ण केले आहे.