वाशिम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आठ शिक्षक प्रतिनियुक्तिवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:54 PM2018-06-15T15:54:08+5:302018-06-15T15:54:08+5:30

वाशिम - येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आठ  शिक्षकांना विषय सहाय्यक म्हणून प्रतीनियुक्तीवर घेण्यात आले आहे.

Eight teachers deputed in the Washim District Education and Training Institute! | वाशिम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आठ शिक्षक प्रतिनियुक्तिवर !

वाशिम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आठ शिक्षक प्रतिनियुक्तिवर !

Next
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात अनेक अंशकालीन प्रशिक्षित उच्च पदवीधर असताना त्यांचा विषय शिक्षक म्हणून रोजगारासाठी विचार होणे आवश्यक होते. तसे न होता प्राथमिक शाळेवर सेवेत असणाºयांनाच पुन्हा संधी देवून सुशिक्षित बेरोजगारांवर आणखी बेकार होण्याची वेळ आणली आहे.प्रतीनियुक्तीवर असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यावर्षीही शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
वाशिम - येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आठ  शिक्षकांना विषय सहाय्यक म्हणून प्रतीनियुक्तीवर घेण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असून, सदर प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेने प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शुक्रवारी केली.
 वास्तविक पाहता ते ग्रामीण भागातील शिक्षक असून विद्यार्थी घडविणे हे त्यांचे कर्तव्य आहे.  वाशिम जिल्ह्यात अनेक अंशकालीन प्रशिक्षित उच्च पदवीधर असताना त्यांचा विषय शिक्षक म्हणून रोजगारासाठी विचार होणे आवश्यक होते. पण तसे न होता प्राथमिक शाळेवर सेवेत असणाºयांनाच पुन्हा संधी देवून सुशिक्षित बेरोजगारांवर आणखी बेकार होण्याची वेळ आणली आहे. तसेच अगोदरच काही शाळांवर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षक देण्याची मागणी वेळोवेळी पालकांमधून होते. दुसरीकडे आठ शिक्षक प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याने शिक्षकांची अधिक पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. पदवीधर शिक्षक असून इयत्ता पाच ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु ते प्रतीनियुक्तीवर असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यावर्षीही शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे शासन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम चालू ठेवते. दुसरीकडे शिक्षकांनी प्रतिनियुक्तीवर अन्यत्र पाठविले जाते. हा प्रकार थांबविण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेने शुक्रवारी दिला.

Web Title: Eight teachers deputed in the Washim District Education and Training Institute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.