विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श; दुर्घटनांची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 01:34 PM2018-04-20T13:34:13+5:302018-04-20T13:34:13+5:30
सोसाट्याचा वारा सुटल्यास विद्युत वाहिन्या तुटण्याची भिती
वाशिम: जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा सुटल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महावितरणनं अशा झाडांच्या फांद्या लवकरात लवकर तोडून टाकाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
दरवर्षी या भागात उन्हाळ्यात अवकाळी पाऊस होतो आणि सुसाट्याचा वारादेखील सुटतो. यावर्षीही आतापर्यंत तीन ते चारवेळा वातावरणात बदल होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि तुफान हवेमुळे अनेक ठिकाणच्या विद्युत वाहिन्या तुटून खाली पडल्याचं प्रकार घडले आहेत. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीचा भाग म्हणून महावितरणनं अशा झाडांच्या फांद्या तोडून विद्युत वाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.