१२ गावांमधील विजेचा प्रश्न गंभीर!

By Admin | Published: June 1, 2017 01:05 AM2017-06-01T01:05:17+5:302017-06-01T01:05:17+5:30

स्वतंत्र फिडरचे काम रखडले : ३५०० ग्राहकांमागे एक लाइनमन

Electricity crisis in 12 villages serious! | १२ गावांमधील विजेचा प्रश्न गंभीर!

१२ गावांमधील विजेचा प्रश्न गंभीर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार : विज देयक अदा करण्यात अव्वल असलेल्या शेलुबाजारसह १२ गावांमधील विजेचा प्रश्न आजमितीस अत्यंत गंभीर झाला आहे. गत दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेले स्वतंत्र फिडर अद्याप कार्यान्वित झाले नसून जवळपास ३५०० ग्राहकांच्या विज समस्या सोडविण्याची जबाबदारी देखील एकाच लाईनमनच्या खांद्यावर असल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिकच गहन होत चालल्याचे दिसून येत आहे.
शेलुबाजार ही वाशिम जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून याठिकाणी घरगुती सुमारे ३५०० विज ग्राहक आहेत; तर व्यावसायीक कनेक्शन ३५० च्या आसपास आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील वीज ग्राहकांना दरमहा १५ लाखापेक्षा अधिक देयक अदा करावे लागते. असे असताना विद्यूत पुरवठ्यात वारंवार उद्भवणाऱ्या बिघाडामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येवर तोडगा म्हणून साधारणत: दीड वर्षापूर्वी शेलुबाजारला स्वतंत्र फिडर मंजूर झाले; परंतू ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. सद्य:स्थितीत शेलुबाजार फिडरवर वनोजा, भूर, पूर, शेंदुरजना मोरे, येडशी, लाठी, हिरंगी, गोगरी, खेर्डा बु., खेर्डा खु. आणि चिखली आदी गावे जोडण्यात आलेली आहेत. यामुळे अनेकवेळ ‘ओव्हरलोड’चा प्रश्न निर्माण होवून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेलुबाजार फिडरअंतगृत गावठाण फिडरचे १६ रोहित्र आणि कृषीपंपाचे असंख्य कनेक्शन असताना एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी केवळ एकच लाईनमन कार्यरत आहे. ही बाब लक्षात घेवून किमान तीन लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यास वेग देण्यात आला आहे. शेलुबाजार येथील स्वतंत्र फिडरचा प्रश्न देखील लवकरच निकाली काढला जाणार आहे. फिडर स्वतंत्र झाल्यानंतर शेलुबाजारसह उर्वरित ११ गावांमध्ये भेडसावणारा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. ग्राहकांनी धीर धरून महावितरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: Electricity crisis in 12 villages serious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.