शहरं
Join us  
Trending Stories
1
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
4
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
5
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
6
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
7
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
8
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
9
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
10
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
11
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
12
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
13
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
14
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
15
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
16
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
17
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
18
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
19
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
20
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

१२ गावांमधील विजेचा प्रश्न गंभीर!

By admin | Published: June 01, 2017 1:05 AM

स्वतंत्र फिडरचे काम रखडले : ३५०० ग्राहकांमागे एक लाइनमन

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : विज देयक अदा करण्यात अव्वल असलेल्या शेलुबाजारसह १२ गावांमधील विजेचा प्रश्न आजमितीस अत्यंत गंभीर झाला आहे. गत दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेले स्वतंत्र फिडर अद्याप कार्यान्वित झाले नसून जवळपास ३५०० ग्राहकांच्या विज समस्या सोडविण्याची जबाबदारी देखील एकाच लाईनमनच्या खांद्यावर असल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिकच गहन होत चालल्याचे दिसून येत आहे. शेलुबाजार ही वाशिम जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून याठिकाणी घरगुती सुमारे ३५०० विज ग्राहक आहेत; तर व्यावसायीक कनेक्शन ३५० च्या आसपास आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील वीज ग्राहकांना दरमहा १५ लाखापेक्षा अधिक देयक अदा करावे लागते. असे असताना विद्यूत पुरवठ्यात वारंवार उद्भवणाऱ्या बिघाडामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येवर तोडगा म्हणून साधारणत: दीड वर्षापूर्वी शेलुबाजारला स्वतंत्र फिडर मंजूर झाले; परंतू ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. सद्य:स्थितीत शेलुबाजार फिडरवर वनोजा, भूर, पूर, शेंदुरजना मोरे, येडशी, लाठी, हिरंगी, गोगरी, खेर्डा बु., खेर्डा खु. आणि चिखली आदी गावे जोडण्यात आलेली आहेत. यामुळे अनेकवेळ ‘ओव्हरलोड’चा प्रश्न निर्माण होवून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेलुबाजार फिडरअंतगृत गावठाण फिडरचे १६ रोहित्र आणि कृषीपंपाचे असंख्य कनेक्शन असताना एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी केवळ एकच लाईनमन कार्यरत आहे. ही बाब लक्षात घेवून किमान तीन लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यास वेग देण्यात आला आहे. शेलुबाजार येथील स्वतंत्र फिडरचा प्रश्न देखील लवकरच निकाली काढला जाणार आहे. फिडर स्वतंत्र झाल्यानंतर शेलुबाजारसह उर्वरित ११ गावांमध्ये भेडसावणारा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. ग्राहकांनी धीर धरून महावितरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे. - विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण