बिल न देताच खंडित केला विद्युत पुरवठा, वाशिममधील शेकडो शेतक-यांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 02:31 PM2017-10-30T14:31:04+5:302017-10-30T14:32:01+5:30

शिरपूर परिसरातील 600 ते 700 गावातील शेतक-यांचा विद्युत पुरवठा पूर्व सूचना न देता खंडित केल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. या विरोधात शेकडो शेतक-यांनी 30 ऑक्टोबर रोजी शिरपूर वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला.

Electricity distribution in Washim | बिल न देताच खंडित केला विद्युत पुरवठा, वाशिममधील शेकडो शेतक-यांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा

बिल न देताच खंडित केला विद्युत पुरवठा, वाशिममधील शेकडो शेतक-यांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा

Next

वाशिम - शिरपूर परिसरातील 600 ते 700 गावातील शेतक-यांचा विद्युत पुरवठा पूर्व सूचना न देता खंडित केल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. या विरोधात शेकडो शेतक-यांनी 30 ऑक्टोबर रोजी शिरपूर वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. वीज बिल न भरल्यानं पुरवठा खंडीत करण्यात आल्याचे कारण या शेतक-यांना देण्यात आले. पण कोणतेही बिल न मिळाल्याचे सांगत शेतक-यांनी यावेळी महावितरणच्या ढिसाळ कारभाराबाबत रोष व्यक्त केला.

शिरपूर परिसरातील वसारी, दुधाळा, कोठा, वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव खवणे येथील शेतक-यांच्या शेतातील वीज पुरवठा थकीत बिलाच्या कारणावरुन खंडित करण्यात आला होता. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय व शेतक-यांना देयक न देताच पुरवठा खंडित केल्याने शेकडो शेतक-यांनी शिरपूर वीज वितरण कार्यालयावर आक्रमकपणे धडक दिली. आधीच उडीद, मूग या शेतमालाला खरेदीदार मिळत नसल्याने व सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने वीज वितरणने शेतक-यांना कृषी पंपाचे वीज बिल न देताच कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. 

त्यामुळे तूर, हळद, कपाशीसह नुकतेच पेरलेला गहू व हरभरा सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सदर गावातील शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतक-यांनी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता ए.व्ही.जाधव यांना वीज बिल न देता व कोणत्याही प्रकारे पूर्व सूचना न देता वीज पुरवठा कसा कापला? असा जाब विचारला.  यावर अभियंता जाधव यांनी वरिष्ठा अधिका-यांसोबत शेतक-यांची मोबाइलवर चर्चा करुन दिली. यावर वीज वितरणचे वरिष्ठ अधिका-यांनी थकीतदार शेतक-यांकडून प्रत्येकी 3 हजार रुपये बिल भरुन घ्यावे व त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा, असा आदेश शिरपूर वीज वितरण कार्यालयाला दिला.

Web Title: Electricity distribution in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी