जलजागृती सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:44 AM2021-03-23T04:44:02+5:302021-03-23T04:44:02+5:30
.............. लाईनमन मुख्यालयी राहण्याची मागणी किन्हीराजा : किन्हीराजासह परिसरातील गावांमध्ये अधूनमधून विद्युत पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होऊन गैरसोय होत आहे. ...
..............
लाईनमन मुख्यालयी राहण्याची मागणी
किन्हीराजा : किन्हीराजासह परिसरातील गावांमध्ये अधूनमधून विद्युत पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होऊन गैरसोय होत आहे. अशा स्थितीत लाईनमन मुख्यालयी असावे, अशी मागणी चंद्रकांत कुटे यांनी कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
...................
कोरोनामुळे मेडशीत लघुव्यावसायिक संकटात
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील लघुव्यावसायिक संकटात सापडले आहेत. दुकाने लवकरच बंद करावी लागत असल्याने अडचणीत आणखीनच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
....................
जऊळका येथील रस्त्याची दुरवस्था
वाशिम : जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथील काहीठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरवून रस्ता दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
........................
आॅटोचालक आर्थिक संकटात
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक ठप्प आहे. याशिवाय शहरात प्रवाशी मिळणेही कठीण झाले आहे. परिणामी, आॅटो खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य झाल्याचे आॅटोचालक राहुल गायकवाड यांनी सांगितले.
...................................
नुकसान भरपाई देण्याची मागणी
वाशिम : १९ मार्च रोजी अचानक सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यात बिजवाई कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर इढोळे यांनी जिल्हाधिकाºयांकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली.
..................
गृह विलगीकरणातील रुग्णांकडे विशेष लक्ष
वाशिम : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गृह विलगीकरणात ठेवलेल्या नागरिकांवर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.