अभियांत्रिकी महाविद्यालये अद्याप बंदच, अर्थचक्र बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:41+5:302021-01-16T04:44:41+5:30
प्राप्त माहितीनुसार, शासनाने ओबीसी व व्हीजेएनटी या घटकातील विद्यार्थ्यांना देय असलेली २०१७-१८ ची शिष्यवृत्ती अद्याप अदा केलेली नाही. २०१८-१९ ...
प्राप्त माहितीनुसार, शासनाने ओबीसी व व्हीजेएनटी या घटकातील विद्यार्थ्यांना देय असलेली २०१७-१८ ची शिष्यवृत्ती अद्याप अदा केलेली नाही. २०१८-१९ पासून महाडीबीटी पोर्टल सुरू झाले. त्यातही अडचणी असल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिली. यासह २०१९-२० ची ५० टक्क्यांपेक्षा अधिक शिष्यवृत्तीची रक्कमही मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांकडून येणारे जवळपास ६० लाख रुपये थकीत असल्याची माहिती सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अॅड. वैशाली वालचाळे यांनी दिली. या आर्थिक संकटामुळे महाविद्यालयाचे अर्थचक्र पूर्णत: बिघडले असून, शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
...................
महाविद्यालयांची संख्या
०१
शासकीय तंत्रनिकेतन
०१
अभियांत्रिकी महाविद्यालय
...........
५५० विद्यार्थी क्षमता
५५
प्राध्यापकांची संख्या
२०
शिक्षकेतर कर्मचारी संख्या
.....................................
पगारासाठी बँकेकडून घेतले कर्ज
जिल्ह्यातील एकमेव विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात ५५ शिक्षक व २० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना कुठलेही शुल्क मागायचे नाही आणि शिष्यवृत्तीची थकीत रक्कमही अदा करायची नाही, या शासनाच्या धोरणामुळे हे महाविद्यालयही अडचणीत सापडले आहे. यंदा तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागले, अशी माहिती प्रा. नीरज वालचाळे यांनी दिली.
...........................................
कोट :
सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय हे पूर्णत: विनाअनुदानित असल्याने विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कातूनच इतर खर्चासह पगार भागविले जातात. असे असताना २०१७-१८ पासून शासनाकडे शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शुल्क जमा झालेले नाही. अशा स्थितीत महाविद्यालय प्रशासनाने बँकेकडून कर्ज घेऊन काही प्रमाणात पगार दिल्याने दिलासा मिळाला आहे.
- सचिन व्यवहारे
संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख