कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर होते. मंडळ कृषी अधिकारी इंगोले, कृषी सहायक भारती, सरपंच शरदराव येवले, पारवा सरपंच गोपाल लुंगे, साहेबराव भगत, अमोल पाटील, गजानन सुर्वे, सुधाकर कालापाड, डॉ. दहातोंडे, सचिव ठाकरे, तलाठी गावंडे, विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, शेतकरी केशवराव भगत, तालुका समन्वयक सुभाष गवई, रवींद्र लोखंडे उपस्थित होते.
समृद्ध गाव स्पर्धेच्या मूल्यांकनाप्रमाणे गावाचे उत्पन्न वाढणे महत्वाचे आहे. याकरिता मधुमक्षिका पालन हा शेतीपूरक व्यवसाय स्वीकारावा, असे आवाहन यावेळी विशेषज्ञ चंद्रशेखर सोनटक्के यांनी केले. मधुमक्षिका पालनात येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उमेद बचत गटाच्या महिलांनी सहभाग घेऊन मधुमक्षिकेच्या पेट्या भरून पाहिल्या. अनसिंग येथील प्रगतशील शेतकरी राजू इंगळे यांनी गांडुळखत व सेंद्रिय शेतीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.