निराधारांच्या कागदपत्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:41 AM2021-01-23T04:41:13+5:302021-01-23T04:41:13+5:30

मंगरुळपीर तालुक्यातील १३३ गावात निराधार योजनेतील लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस ...

Examination of the documents of the destitute | निराधारांच्या कागदपत्रांची तपासणी

निराधारांच्या कागदपत्रांची तपासणी

Next

मंगरुळपीर तालुक्यातील १३३ गावात निराधार योजनेतील लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटलांच्या पथकाद्वारे ही मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत आसेगाव येथे २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाभार्थींच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यातून आसेगाव येथील ३२३ लाभार्थींपैकी १२६ लोकांकडील कागदपत्रे गोळा करण्यात आली, तर इतर लाभार्थी आवश्यक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, परितक्त्या, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी दिव्यांग योजनेतील लाभार्थींची कागदपत्रे गोळा करण्यात आली आहेत. यावेळी आसेगावचे तलाठी व्ही. आर. लोंढे, ग्रामसचिव अब्दुल्ला कादर शेख, मंडल अधिकारी डी. डी. जाधव, पोलीस पाटील शिलवंत भगत, कोतवाल आर. पी. राठोड आणि सरपंच गजानन मनवर यांच्यासह ग्रा.पं. सदस्यांची उपस्थिती होती.

===Photopath===

220121\22wsm_5_22012021_35.jpg

===Caption===

निराधारांच्या कागदपत्रांची तपासणी

Web Title: Examination of the documents of the destitute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.