वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ८९ अस्थाई पदांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:10 PM2019-04-10T14:10:22+5:302019-04-10T14:10:44+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ फेब्रूवारी २०१९ रोजी संपुष्टात येत असलेल्या ८९ अस्थाई पदांना ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांसह तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ फेब्रूवारी २०१९ रोजी संपुष्टात येत असलेल्या ८९ अस्थाई पदांना ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे संबंधित पदांवर काम करणाºया अधिकारी, कर्मचाºयांना दिलासा मिळण्यासोबतच रुग्णांचीही सोय होणार आहे.
मुदतवाढ देण्यात आलेल्या पदांमध्ये बधीरीकरण शास्त्रज्ञ, शरिरविकृती चिकित्सक, बालरोगतज्ज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया), निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क), वैद्यकीय अधिकारी (रक्त संक्रमण), वैद्यकीय अधिकारी-वर्ग २, ट्रामा केअर युनिट, अस्थिव्यंग शल्य चिकित्सक, बधीरीकरण शास्त्रज्ञ, सी.टी. स्कॅन, क्ष-किरण शास्त्रज्ञ, सांख्यीकी सहायक, अभिलेखापाल, रक्तपेढी तंत्रज्ञ, वाहन चालक, अधिपरिचारिका, टंकलेखक, बाह्यरूग्ण सेवक, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक, अपघात विभाग सेवक आदी ८९ पदांचा समावेश आहे. पदांना मुदतवाढ मिळाल्याने त्यावर कार्यरत अस्थाई अधिकारी, कर्मचाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.