डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; ९०० ज्येष्ठांसमोर अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:42 AM2021-05-12T04:42:39+5:302021-05-12T04:42:39+5:30

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित होत ...

Eye surgery jam; Darkness in front of 900 elders! | डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; ९०० ज्येष्ठांसमोर अंधार !

डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; ९०० ज्येष्ठांसमोर अंधार !

Next

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित होत असल्याचे दिसून येते. सन २०१९-२० या वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयात १२०० नेत्र शस्त्रक्रिया झाल्या होत्या तर गतवर्षात केवळ १९० शस्त्रक्रिया झाल्या. कोरोनाकाळात जवळपास ९०० ज्येष्ठांच्या शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या असून, कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर शस्त्रक्रिया पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू केले होते. या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य विभागानेसुद्धा अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. त्याचा फटका नेत्र रुग्णांनाही बसला. जवळपास पाच ते सहा महिने शस्त्रक्रिया ठप्प होत्या. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नेत्र शस्त्रक्रिया पूर्ववत झाल्या. यादरम्यान १९० नेत्र शस्त्रक्रिया झाल्या. आता दुसरी लाट असल्याने गत दीड महिन्यात एकही नेत्रशस्त्रक्रिया झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक आरोग्य सेवेला प्राधान्य दिले जात आहे. नेत्र शस्त्रक्रियेचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, अतिजोखमीच्या गटातील असल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याने, कोणताही धोका नको म्हणून नेत्रशस्त्रक्रिया या दरम्यान बंद ठेवण्यात येत आहेत.

०००००

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाआधी वर्षभरात झालेल्या नेत्र शस्त्रक्रिया १२००

गेल्या वर्षातील नेत्र शस्त्रक्रिया १९०

०००००००

कोरोनापूर्वी नियमित नेत्रशस्त्रक्रिया केल्याही जात होत्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णही शक्यतोवर येत नाहीत.

- डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक

००००

अंधार कधी दूर होणार?

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सरकारी रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी एप्रिल महिन्यात गेलो होता. मात्र, कोरोनामुळे शस्त्रक्रिया विभाग बंद असल्याने शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.

- तुकाराम इंगळे

००

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनापूर्वी जास्त प्रमाणात नेत्र शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. कोरोना आला आणि शस्त्रक्रियाही ठप्प झाल्या, अशी परिस्थिती आहे. शस्त्रक्रिया कधी होणार याची प्रतीक्षा आहे.

- शालीग्राम वाठ

०००

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असल्याचे सांगण्यात येते. मात्र, डोळ्याची शस्त्रक्रिया लांबणीवर टाकली आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा विचार आहे.

- शंकर वानखडे

००००

Web Title: Eye surgery jam; Darkness in front of 900 elders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.