शेतकरी बनले कामरगावचे कैवारी; स्वखर्चाने गावाला पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:26 PM2018-06-12T16:26:50+5:302018-06-12T16:26:50+5:30
कामरगाव : ग्रामस्थांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहून शेतकऱ्यांनी पुढे येवून कामगरवाच्या पाण्याची समस्या मिटवून ते कामरगाववासियांचे कैवारी बनलेत.
कामरगाव : कामरगावला बेंबळा व कुºहाड या दोन ठिकाणाहुन होणारा पाणी पुरवठा कुचकामी ठरला. ग्रामपंचायतने बेंबळा येथील पाणी पुरवठासाठी दोन विहीरी अधिग्रहण करुन सुध्दा कामरगावमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला. ग्रामस्थांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहून शेतकऱ्यांनी पुढे येवून कामगरवाच्या पाण्याची समस्या मिटवून ते कामरगाववासियांचे कैवारी बनलेत.
गावात असलेल्या चारही विहीरी कोरड्या पडल्यात, पर्यायी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करु सुध्दा पाणी मिळेनासे झाले.
अखेर ग्रामपंचायतने ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय लावण्यासाठी गावलगतच्या काही शेतकºयाना गावातील भीषण पाणी टंचाई संदर्भात अवगत करुन गावाला पाणी देण्याची विनंती केली. ग्रामपंचायतच्या विनंतीला सुखदेवराव काळबांडे, गणीभाई , उत्तमराव पुंड , गणपतराव गांजरे व धनराज हेडा या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाणी स्वत: खर्चाने पाईपलाईन टाकून गावाला पाणी पुरवठा सुरु केला आहे.
मिना भोने यांची भूतदया!
कामरगावच्या जि.प.सदस्या मिना रामदास भोने यांनी आपल्या गाव लगतच्या शेतातील बोअरवेलवरुन कामरगाववासीयांनासाठी पाणी वाटप तर केलेच सोबतच मुक्याजनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था केली. गावातील जनावरे तसेच जंगली प्राणी यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रात्री १२ वाजेपर्यंत बोअरवेल चालवुन व स्वत: तेथे उपस्थित राहून पाण्याची समस्या मिटविली.