लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी कामरगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, विषमुक्त शेती करण्याची शपथ घेतली आहे. रविवारी यासंदर्भात जूनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकही घेण्यात आली.या बैठकीला परिसरातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. सदर बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी रासायनिक खत व किटकनाशकाची शेती सोडून विषमुक्त सेंद्रीय शेती करण्याची शपथ घेतली. कामरगाव येथे पार पडलेल्या बैठकीत जमिन तयार करणे, नागमोडी पेरणी करणे, खत तयार करणे, फवारणी औषध तयार करणे, गावराण बियाणे जमा करणे, लाकडी तेलघाणी सुरू करणे, जात्यावरील तुरदाळ तयार करणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीत डॉ. निलेश हेडा, प्रगतशिल शेतकरी पवन मिश्रा व संजय भगत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला सुरूवात करण्यापूर्वी निसर्ग शेतकरी ग्रुप अमरावती मधील मृत शेतकऱ्याला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बैठकीला बंडुभाउु इंगोले, गजानन ठाकरे, विनोद सिदगुरू, संतोष हिंगणकार, संजय ढवक, नितीन भोयर, अशोक मते, यांच्यासह अनेक शेतकºयांची उपस्थिती होती. तसेच बैठकीला उपस्थित शेतकºयांनी प्रत्येकी २ ते ४ एकरापर्यंत सेंद्रीय शेती करण्याची शपथ घेतली.
कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली विषमुक्त शेती करण्याची शपथ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 1:56 PM