पिकांच्या नुकसानभरपाईकडे खिळली शेतकऱ्यांची नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:36 PM2019-11-19T12:36:00+5:302019-11-19T12:36:11+5:30

अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

Farmers look at crop damage compansation | पिकांच्या नुकसानभरपाईकडे खिळली शेतकऱ्यांची नजर!

पिकांच्या नुकसानभरपाईकडे खिळली शेतकऱ्यांची नजर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे अडीच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. नुकसानभरपाईपोटी संबंधित बाधीत शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीची गरज असल्याचा अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष नुकसानभरपाई कधी मिळणार, याकडे शेतकºयांची नजर खिळली आहे.
जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून सलग ९ दिवस अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने आपापल्या स्तरावर नुकसानाची पाहणी व पंचनामे केले. ‘डाटा एन्ट्री’दरम्यान सर्व पंचनाम्यांची पुर्नपडताळणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नुकसानाचा अंतीम अहवाल सादर केला. त्यानुसार, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ५९ हजार ७०१ हेक्टरवरील सोयाबिन, २० हजार ६३५ हेक्टरवरील कपाशी, १३३३ हेक्टरवरील तूर, २२२२ हेक्टरवरील भाजीपाला, १७४ हेक्टरवरील पपई, १११ हेक्टरवरील हळद, ४९४ हेक्टरवरील संत्रा, २७ हेक्टर लिंबू, ६५ हेक्टरवरील डाळींबाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले असून २ लाख ५० हजार ३५० बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाईपोटी १९७ कोटी ८९ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीची गरज असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण झाल्याने शासनस्तरावरून नेमकी मदत कधी मिळणार, याकडे जिल्हाभरातील बाधीत शेतकºयांची नजर खिळली आहे.  

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिरायत पिकाखालील २लाख ४६ हजार ३९४, बागायती पिकाखालील ३५२२; तर फळपिकाखालील ४३४ अशा एकूण २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांच्या २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंतीम अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय नियमानुसार बाधीत शेतकºयांना मदतीसाठी १९७.८९ कोटी रुपयांची गरज आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Farmers look at crop damage compansation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.