पीक कर्ज माफीबाबत शेतकरी अद्याप संभ्रमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:04 PM2018-04-23T15:04:35+5:302018-04-23T15:04:35+5:30
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून त्यांचे सातबारा कोरे झाले आहेत.
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून त्यांचे सातबारा कोरे झाले आहेत. मात्र, उर्वरित हजारो शेतकऱ्यांनी रितसर ‘आॅनलाईन’ अर्ज सादर करूनही ते कर्ज माफीपासून अद्याप वंचित आहेत. दरम्यान, कर्ज माफीच्या अंतीम यादीत संबंधितांची नावे समाविष्ट केली असावीत, असा अंदाज प्रशासकीय सूत्रांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे या यादीची शेतकºयांना प्रतीक्षा लागून आहे.
वाशिम जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर संंबंधित बँकांकडून सद्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता कर्ज वाटप केले जात आहे. त्यानुषंगाने यंदा १४७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना शासनाकडून कर्ज माफी मिळाली, त्यांचा पुढचे कर्ज घेण्याचा मार्ग सुकर झाला असून काही शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्ज माफीची प्रतीक्षा न करता स्वत:जवळून कर्जाचे पैसे भरत पुढच्या हंगामाकरिता कर्ज घेणे सुरू केले आहे. यात मात्र चलन तुटवड्याची अडचण प्रकर्षाने जाणवत असून कर्ज माफीची अंतीम यादी अद्याप अप्राप्त असल्याने काही शेतकऱ्यांची पुरती फसगत झालेली आहे. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून उर्वरित यादी तत्काळ यादी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.