शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 03:36 PM2019-04-09T15:36:26+5:302019-04-09T15:36:30+5:30
शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही. त्यामुळे खरीपाची तयारी वांध्यात आली आहे.
दरवर्षी १ मार्च किंवा १ एप्रिलला जिल्हा मध्यवर्ती बँक सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकºयांना पीककर्ज वाटपास सुरुवात करते. त्यामुळे यंदा पीककर्ज मिळण्यात अडचणी येऊ नयेत, पीककर्जावरील व्याजमाफी मिळावी म्हणून शेतकºयांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी घेतलेले पीककर्ज व्याज माफी मिळावी म्हणून, घरी असलेला शेतमाल कमी दरात विकून, वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढून बँकांमध्ये भरले. त्यामुळे यंदा त्यांना नव्याने पीककर्ज घेणेही सोयीचे झाले होेत. आता बँक कर्ज वाटपास सुरुवात करेल, अशी अपेक्षाही शेतकºयांना होती; परंतु चक्क ९ एप्रिल ही तारीख उजाडली तरीही बँकेच्यावतीने पीक कर्ज वाटप सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीत खोडा निर्माण झाला असून, शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र शिरपूरसह मालेगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे.
माझ्याकडे असलेल्या पीककर्जाचा भरणा वाघी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत ३१ मार्च रोजी केला आहे. यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीलाच पिककर्ज वाटप होत होते. त्यामुळे शेती मशागतीसह खत बियाणे खरेदीसाठी पीककर्जाची रक्कम आमच्या कामी पडत होती. यंदा ९ एप्रिलपर्यंत ही पीककर्ज वाटप करण्यात न आल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
-बाळासाहेब वाघ
शेतकरी, वाघी बु. (मालेगाव)