लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.गत दोन वर्षांपासून राज्यभरात बोंडअळीचा प्रादूर्भाव होत असल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास शेंदरी वा गुलाबी बोंडअळी सुप्तावस्थेत जाते; परंतु फरदडीमुळे तिचा जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात येणाºया कपाशीवर तिचा पुन्हा प्रादूर्भाव होतो. यावर नियंत्रणासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. त्यांच्यावतीने पत्रकांद्वारे बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीचे सुरुवातीचे वेचे आटोपल्यानंतर फरदडीचा विचार न करता कपाशी उपटून शेत मोकळे करणे, शेतात शेळ्या, मेंढ्या चारणे, डिसेंबर महिन्यानंतर ५ ते ६ महिने शेत कापूस विरहित ठेवणे आदि सुचना देण्यात येत आहेत. कपाशीच्या पºहाट्यांतही या किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने पºहाटीची गंजी शेताच्या बांधावर ठेवणे अयोग्य ठरते. त्यामुळे कापूस काढणीनंतर पºहाट्या, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे, पालापाचोळा नष्ट करण्यासह पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरटी करण्याच्या सुचनाही कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत; परंतु बहुतांश शेतकºयांना या सुचना कळल्याच नाहीत. त्याचे गांभिर्यही शेतकºयांना कळू शकले नाही. अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेण्याच्या विचाराने शेतातील कपाशी उपटलेली नाही. त्यामुळे पुढील वर्षीही कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने गावागावांत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिनिंग, प्रेसिंग मिलमध्येही कामगंध सापळ्यांचा अभावहंगामातील कपाशीचा वेचा झाल्यानंतर जिनिंग, प्रेसिंगमध्ये विक्री केली जाते. शेतकºयांनी विकलेल्या कपाशीपासून रुई, सरकी वेगळी करून कपाशीच्या गाठी तयार केल्या जातात. खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगाम संपेपर्यंतही ही कपाशी अनेक महिने जिनिंग, प्रेसिंगमध्ये राहते. त्यामुळे अशा ठिकाणी कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावण्याच्या सुचना कृषी विभागाने दिल्या आहेत. या सुचनांचीही गांभिर्याने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कपाशीच्या फरदडीवर जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 6:07 PM