जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा ई-नाममध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:49+5:302021-03-16T04:41:49+5:30
शेतमाल खरेदीच्या प्रक्रियेत सुसूत्रता यावी, बाजार समित्यांमधील व्यवहार पारदर्शक व्हावे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य दर मिळावेत म्हणून केंद्र शासनाने ...
शेतमाल खरेदीच्या प्रक्रियेत सुसूत्रता यावी, बाजार समित्यांमधील व्यवहार पारदर्शक व्हावे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य दर मिळावेत म्हणून केंद्र शासनाने बाजार समित्यांची कक्षा वाढविण्यासाठी ई-नाम योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत देशभरातील कोणताही व्यापारी कोणत्याही बाजार समितीत शेतमालाच्या लिलावात सहभागी होऊन शेतमालाची खरेदी करू शकतो. यामुळे खरेदी प्रक्रियेत स्पर्धा वाढून शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगले दर मिळू शकतात. वाशिम जिल्ह्यातही ही योजना राबवली जात असून, जिल्ह्यातील सहापैकी पाच बाजार समित्यांचा ई-नाममध्ये समावेशही करण्यात आला. त्यात मंगरुळपीर, रिसोड, कारंजा, वाशिम आणि मानोरा या बाजार समित्यांचा समावेश आहे; परंतु यातील केवळ रिसोड आणि मंगरुळपीर येथील बाजार समितीमध्ये ई-नामनुसार शेतमालाची खरेदी-विक्री होत आहे. तर इतर बाजार समित्यांत मात्र अद्यापही ई-नाम अंतर्गत व्यवहार होत नाहीत.