मालेगाव येथे चतुर्थ आंतराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:37 PM2018-06-15T18:37:33+5:302018-06-15T18:37:33+5:30
वाशिम: येत्या २१ जून रोजी साजरा केल्या जाणाºया आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी मालेगाव योग समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
वाशिम: येत्या २१ जून रोजी साजरा केल्या जाणाºया आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी मालेगाव योग समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मातोश्री संकुल शेलू फाटा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रभारी गजानन धर्माळे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश सदस्य गोपाल पाटिल राऊत प्रांतीय सदस्य रामदास धनवे, सह राज्यप्रभारी शंकर नागपुरे, किसान पंचायतचे शंकर ठाकरे, बाळूभाऊ काळे, जिल्हा कोषाध्यक्ष भगवंतराव वानखडे आदिंची उपस्थिती होती. या बैठकीत २१ जून रोजी मालेगाव येथे आयोजित योग दिनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. युवा स्वालंबन आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त शहरातील ना. ना. मुंदडा विद्यालय मालेगाव येथे २१ जून रोजी सकाळी सहा ते आठ या वेळात भव्यदिव्य योग शिबिराचे आयोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यासाठी योग प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यातून प्रशिक्षित शिक्षक येणार आहेत, तसेच २० जून रोजी सकाळी ११ वाजता भव्य दुचाकी रॅली काढून शहरामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. योग दिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समिती मालेगाव व सर्व समाजातील व सर्व राजकीय पदाधिकारी व्यापारी विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी उद्योजक महिला व पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन व प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी असेही यावेळी ठरले. यामध्ये पतंजली योग समितीकडून विविध समाजोपयोगी योजना राबविण्यात येणार आहे. याची माहिती गजानन धर्माळे यांनी दिली. त्यामध्ये युवा स्वालंबन शिबीर निवासी पतंजली कॉल रोजगार निर्मिती २३ ते २७ जून वाशिम येथे होईल. पतंजली योग समितीमार्फत बीएसएनएलचे सीम कार्ड सुद्धा उपलब्ध होईल. स्वदेशी समृद्धी कार्ड योजना सुद्धा कार्यांन्वित करण्यात येईल. यावेळी शंकर नागपुरे, गोपाल पाटील राऊत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी तालुका प्रभारी यशवंतराव जावळे, दिनेश उंटवाले, नामदेव बोरचाटे, तेजस आरु, विष्णू उगले, नितीन काळे, अनिल गवळी, सुनिल राऊत, मंगेश गवळी, उमेश आंधळे, दिनेश नाकट यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.