मंगरुळपीर(जि.वाशिम), दि. २0- ग्राम पंचायतच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या बँक खात्यातून ८२ हजार रुपये काढुन फसवणुक केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी मुकेश सुरडकर, सचिव ग्रामपंचायत तर्हाळा यांनी २८ जुलै २00९ रोजी पोलिसात तक्रार दिली होती की, आरोपी महादेव बारकुजी भगत रा.तर्हाळा याने दलित वस्ती सुधार योजनेच्या विदर्भक्षेत्रीय बँक शाखा, मंगरुळपीर येथील खात्यामधून ८२ हजार रुपये काढुन घेवून फसवणुक केली. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम ४२0 भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला. यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक एम.बी. प्रजापती यांनी करुन न्यायालयात दोषारोपात्र दाखल केले. यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक एम.बी. प्रजापती यांनी करुन न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. यानंतर साक्ष पुराव्याच्या आधारे येथील न्यायालयाचे विद्यमान न्यायदंडाधिकारी एस.एन.रोकडे यांनी आरोपीस दोषी ठरवून कलम ४२0 अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली असून सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड.एम.जी.शर्मा यांनी बाजु मांडली तर पोहेकाँ अरुण राऊत व पो.काँ.गजानन बैरवार यांनी सहकार्य केले.
फसवणुक; आरोपीस तीन वर्षे कारावास
By admin | Published: September 21, 2016 2:16 AM