हनवतखेडा येथे २० गॅस व १०० विद्युत मीटरची मोफत जोडणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:57 PM2018-04-23T13:57:49+5:302018-04-23T14:05:26+5:30
मालेगाव - आदर्श गाव हनवतखेडा येथे २२ एप्रिलला सायंकाळी ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजनेधमून २० गॅस जोडणी व १०० विद्युत मीटरचे वाटप करण्यात आले.
मालेगाव - आदर्श गाव हनवतखेडा येथे २२ एप्रिलला सायंकाळी ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजनेधमून २० गॅस जोडणी व १०० विद्युत मीटरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाल पाटील राऊत होते. या प्रसंगी मालेगाव येथील एका गॅसचे संचालक प्रवीण पाटील व रिसोड मतदार संघाचे विस्तारक रमेश आप्पा खोबरे, पंचायत समिती सभापती मंगला गवई, सरपंच सुनील पाटील राऊत, सेवा सरकारी सोसायटीचे अध्यक्ष हरिदास पाटील, उपसरपंच संतोष भगत व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी मंडळी उपस्थिती होती
याप्रसंगी प्रवीण पाटील यांनी गॅसचे महत्त्व पटवून सांगितले. गोपाल पाटील राऊत यांनी गावाचे नंदनवन करायचे असेल तर गावकºयांनी एकत्रित येऊन सहकारातून विकास साधावा. हनवतखेडा हे गाव वाशीम जिल्ह्यात आदर्श करण्याच्या दृष्टीने या गावामध्ये असंख्य योजना खेचून आणणार, असे सांगितले. तंटामुक्त गाव अभियानामधून ३०० टाक्यांचा वाटप केला असून आता सर्व गावातील घरांना नेमप्लेट लागणार आहे. गावात रस्ते, विद्युुत, पाणी याची कुठेही कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही दिली.
हनवतखेडा हे गाव बँकिंग आॅनलाइन करण्यासाठी सर्व नागरिकांनी झिरो बॅलेन्सवर ग्रामीण बँक या शाखेत खाते उघडावे ते खाते उघडण्याची सुविधाही ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेली आहे असे ते म्हणाले. या प्रसंगी २० महिलांना गॅसचे व १०० नागरिकांना विद्युत मीटरचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच संतोष भगत, त्र्यंबक राऊत, नारायण तीवाले, रमेश राऊत, विष्णु गिरे, डिगांबर भागवत, भीमराव चंद्रशेखर. देविदास डहाणे, उकंडा डाखोर,े रामदास तिवाले, दत्ता शेळके, राहुल भगत, गोपीचंद गवळी, उमेश राऊत, दिनेश नाकात, संगीता राऊत, माणिकराव राऊत, बाळू भगत, समाधान भगत, मधुकर मिराशे यांच्यासह गावकºयांची उपस्थिती होती. संचालन संजय भगत यांनी तर आभार सरपंच सुनील पाटील राऊत यांनी मानले.