गाव तलावातील गाळ काढण्यासाठी मोफत मशिनरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:07+5:302021-03-13T05:16:07+5:30

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आप-आपल्या गावाच्या हद्दीमध्ये असलेले लहान मोठे जलाशय,तलाव अथवा पाणवठ्यातील साचलेला गाळ काढण्यासाठी ...

Free machinery for sludge removal from village ponds | गाव तलावातील गाळ काढण्यासाठी मोफत मशिनरी

गाव तलावातील गाळ काढण्यासाठी मोफत मशिनरी

Next

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आप-आपल्या गावाच्या हद्दीमध्ये असलेले लहान मोठे जलाशय,तलाव अथवा पाणवठ्यातील साचलेला गाळ काढण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) वतीने मोफत मशिनरी देण्यात येणार असून जिल्ह्यातील गावकऱयांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बीजेएसच्यावतीने करण्यात आले आहे.

गावातील तलाव लहान मोठे तलाव,जलाशय पानवठ्यात इत्यादी ठिकाणचा साचलेला गाळ काढल्यानंतर शेतकऱयांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत नेता येणार आहे. यासाठी मागणी करणाऱ्या गावांना मोफत जेसीबी अथवा पोकलेंन मशिनरी* देण्याची योजना भारतीय जैन संघटनेने जाहीर केली आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणावर काम भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) केले आहे.आता थेट गावांनाच या कामात सहभागी करून घेण्याचे बीजेएसने ठरवले असून यासाठी आवश्यक त्या मशीन्स बीजेएस संबंधित गावांना देणार आहे.या मशीनला लागणारे डिझेल आणि मशीन चालकाचे मानधन मागणी करणाऱ्या गावाने द्यायचे आहे.

सदर गाळ काढण्याचे काम त्या ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली चालणार आहे.लाभार्थी शेतकऱ्यांना गाळ वापराचे प्रशिक्षण आणि मोफत गाळ घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतः च्या खर्चाने हा गाळ घेऊन जायचा आहे.ज्या ज्या गावांना या सामाजिक कामात सहभागी व्हायचे आहे त्यांनी बीजेएस सुजलाम सुफलाम प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा,जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत पोफळकर यांच्याशी लेखी पत्राद्वारे संपर्क साधावा.

Web Title: Free machinery for sludge removal from village ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.