संत्रा व डाळींब फळपिकाकरीता फळपिक विमा योजना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:51 PM2018-06-12T15:51:23+5:302018-06-12T15:51:23+5:30
वाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा व डाळींब या फळपिकासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना राबविली जात आहे.
वाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा व डाळींब या फळपिकासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना राबविली जात असून, योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांना सहभागी होण्याची अंतिम तारीख संत्रा पिकासाठी १४ जून २०१८ व डाळींब पिकासाठी १४ जुलै २०१८ अशी आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.
मृगबहार संत्रा फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डी आसरा व राजगांव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहॉगीर व रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपुर, चांडस व मेडशी, मंगरुळपीर तालुक्यातील मंगरुळपीर, शेलु खु., पोटी, कवठळ, धानोरा, शेलुबाजार व पार्डी ताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली,उमरी बु. व कुपटा आणि कारंजा तालुक्यातील उंबडार्बाजार, कारंजा, कामरगांव, धनज बु., पोहा, खेर्डा बु., हिवरा लाहे व येवता या महसुल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे.
मृगबहार डाळींब या फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील पार्डी आसरा, राजगांव व पार्डी टकमोर तसेच मंगरुळपीर तालुक्यातील मंगरुळपीर, आसेगांव, शेलुबाजार, कवठळ, धानोरा व पाडीर्ताड. मालेगाव तालुक्यातील मुंगळा आणि मानोरा तालुक्यातील उमरी बु. या महसुल मंडळाचा समावेश आहे. जिल्ह्यात संत्रा या फळपिकाकरीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी ७७ हजार रुपये असून शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता प्रति हेक्टर ३८५० रुपये असुन उर्वरीत रक्कम शासन भरणार आहे. जिल्ह्यात डाळींब या फळपिकाकरीता विमा संरक्षित रक्कम १ लाख २१ हजार असून शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम प्रतीहेक्टरी ६०५० रुपये आहे. उर्वरीत रक्कम शासन भरणार आहे.विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजिकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेत जावे तसेच अधिक माहितीसाठी बँक, तालुका कृषि अधिकारी , मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.