रिसोड शहराच्या विकासाकरीता दीड कोटी रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:56 AM2021-02-27T04:56:01+5:302021-02-27T04:56:01+5:30
शुक्रवार २६फेब्रुवारी रोजी खासदार गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये ही माहीती देण्यात आली. या बैठकीला शिवसेना शहर प्रमुख ...
शुक्रवार २६फेब्रुवारी रोजी खासदार गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये ही माहीती देण्यात आली. या बैठकीला शिवसेना शहर प्रमुख अरुण मगर, निवासी उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे, युवा सेना तालुका प्रमुख अॅड. गजानन आवताडे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. शहर विकासाच्या अनुषंगाने खासदार गवळी यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान योजनेअंतर्गत रिसोड शहराचा विकासाकरता दिड कोटी रुपयांचा कामे मंजुर झाली आहे. सन २०२० - २१ च्या जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यात नगरोत्थान योजनेअंतर्गत ही कामे घेण्यात आली आहे. गत वर्ष भरापासुन कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शासनाने विविध विकासात्मक कामे बंद केली होती. परंतु शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून खासदार गवळी यांनी रिसोड शहरातील विविध विकासात्मक कामा करिता जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यात नगरोत्थान योजनेअंतर्गत दिड कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करून निधी मंजूर करून घेतला आहे. खासदार गवळी यांच्या प्रयत्नातुन मंजूर झालेल्या निधीमुळे रिसोड शहरातील प्रभागातील महत्वपुर्ण रस्ते, नाल्या आदी विकासात्मक कामांना चालना मिळणार असुन शहरातील नागरिकांची महत्वपूर्ण समस्या मार्गी लागणार आहे.