वाशिम: धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित शाळा, नगरपालिका शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका नगरपरिषद शाळा, अपंग शाळांमंध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ शाळांना मिळून पायाभूत सुविधांसाठी एकूण २२ लाख रुपये निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती २७ जानेवारी रोजी प्राप्त झाली.
अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित शाळा, नगरपालिका शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका नगरपरिषद शाळा, अपंग शाळांमंध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयान्वये अनुदान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सन २०१७-१८या आर्थिक वर्षाकरीता संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावातील पात्र शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अंतर्गत वाशिम जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय निवड समितीने उपरोक्त शासन निर्णयानुसार त्यांचेकडे प्राप्त अजांची छाननी करून, पात्र शाळांची यादी, शिफारशी व आवश्यक निधीच्या मागणीसह मंजुरीकरीता शासनाकडे पाठविली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे पाठविध्यात आलेल्या प्रस्तावांची शासनस्तरावर पुन्हा छाननी करुन अपूर्ण किंवा त्रुटी असलेले प्रस्ताव अपात्र करण्यात आले आहेत. या छाननीअंती वाशिम जिल्ह्यातील ११ शाळा पात्र ठरल्या असून, या शाळांना शासन निर्णयानुसार प्रत्येकी २ लाख रुपये प्रमाणे एकूण २२ लाख रुपये निधी पायाभूत सुविधांसाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमान उर्दू हायस्कूल मंगरुळपीर, प्रियदर्शनी इंग्रजी प्राथमिक शाळा कारंजा, हाजी बदरोद्दिन बेनीवाले उर्दू हायस्कूल वाशिम, रहेमानिया उर्दू प्राथमिक मराठी शाळा रिसोड, महात्मा गांधी निवासी मूकबधीर विद्यालय वाकद ता. रिसोड, सैलानीबाबा उर्दू प्राथमिक मराठी शाळा कारंजा, महंमद नूर उर्द माध्यमिक विद्यालय उंबर्डा बाजार ता. कारंजा, राजीव गांधी निवासी कर्णबधीर विद्यालय वाघी खुर्द ता. रिसोड, हजरत आयेशा उर्दु हायस्कूल काजळेश्रव ता. कारंजा, हजरत अबुबकर सिद्धिक इंग्रजी प्राथमिक शाळा कारंजा, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल वाशिम आदि शाळांचा समावेश आहे.