दिव्यांगांसाठी झटणाऱ्या चेतन सेवांकुर ग्रुपचा गणेश मंडळाकडून गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:06+5:302021-09-18T04:44:06+5:30
मोप येथील कुमारेश्वर महादेव मंदिरात गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात एक गाव एक गणपती संकल्पनेअंतर्गत गणेश स्थापना केली. या ...
मोप येथील कुमारेश्वर महादेव मंदिरात गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात एक गाव एक गणपती संकल्पनेअंतर्गत गणेश स्थापना केली. या गणेश मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून दिव्यांगांसाठी झटणाऱ्या चेतन सेवांकुरच्या अंध मुलांचा भावगीतांचा कार्यक्रम ठेवला. चेतन सेवांकुर ग्रुपच्या माध्यमातून पांडुरंग उचितकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अंध व अपंग मुलांचा सांभाळ करीत असून, त्यांच्याच मार्गदर्शनात चेतन सेवांकुरचे अंध, दिव्यांग सदस्य सांस्कृतिक व प्रबोधन कार्यक्रम सादर करीत असतात. पांडुरंग उचितकर यांच्या या कार्याची दखल घेत कुमारेश्वर गणेश मंडळाने त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांना दोन क्विंटल अन्नधान्य व एकवीस हजार रुपये रोख स्वरुपात देणगी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश मंडळाचे सर्व तरुण व गावकरी यांनी सहकार्य केले.