शासकीय गोदामाचा प्रस्ताव दोन वर्षापासून धूळखात

By Admin | Published: December 24, 2014 12:38 AM2014-12-24T00:38:17+5:302014-12-24T00:38:17+5:30

रिसोड तालुक्यात धान्य साठविण्याची व्यवस्थाच नाही.

Government warehouse proposal for two years in the dust | शासकीय गोदामाचा प्रस्ताव दोन वर्षापासून धूळखात

शासकीय गोदामाचा प्रस्ताव दोन वर्षापासून धूळखात

googlenewsNext

विवेकानंद ठाकरे / रिसोड
येथे शासकीय धान्य साठविण्यासाठी गोदाम निर्माण करण्यात यावा यासाठी तहसिसल प्रशासनाने अन्न पुरवठा मंत्रालयाकडे पाठविलेला प्रस्ताव गत दोन वर्षापासून धूळखात आहे. परिणामी, धान्य साठवण्यासाठी तहसिल प्रशासनावर गोदाम भाड्याने घेण्याची पाळी आली असुन यामध्य शासनाच्या पैशांचा चुराळा होत आहे.
येथे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांंना वाटपासाठी मिळणारे धान्य साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील तहसिल प्रशासनाने सन २0११ -१२ मध्ये गोदाम निर्माण करण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यासाठी हिंगोली मार्गावरील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूची जागाही प्रस्तावित करण्यात आली होती. तब्बल एक कोटी रूपयांचे अंदाजपत्रकही प्रस्तावासोबत पाठविले होते. परंतु हा प्रस्तावच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे रखडला आहे.सद्यस्थितीत तालुक्यात शासकीय धान्य साठविण्यासाठी एकही गोदाम नाही. परिणामी, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत तालुक्याच्या वाट्याला येणारे धान्य साठविण्यासाठी तहसिल प्रशासनाला भाड्याच्या गोदामाचा आधार घ्यावा लागतो. भाड्याच्या गोदामामध्ये पुरेशी सदर गोदामांध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे.

Web Title: Government warehouse proposal for two years in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.