धनज येथे १८ जूनला भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 08:11 PM2018-06-14T20:11:29+5:302018-06-14T20:11:29+5:30

जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील धनज बु. येथील शिव मनमोहन पार्श्वनाथ देवालयाचे आमूल-चूल जिर्णोध्दार करण्यात आले असून, आगामी १७ व १८ जून रोजी धनज येथे देवालयात भव्याती भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Grand Anjana Shalaka Prestige Festival on June 18 at Dhananjay | धनज येथे १८ जूनला भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सव

धनज येथे १८ जूनला भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सव

Next

वाशिम: जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील धनज बु. येथील शिव मनमोहन पार्श्वनाथ देवालयाचे आमूल-चूल जिर्णोध्दार करण्यात आले असून, आगामी १७ व १८ जून रोजी धनज येथे देवालयात भव्याती भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सकल जैन समाज अध्यक्ष तथा माजी खासदार विजयबाबू दर्डा यांच्यासह समाजातील मान्यवर मंडळीची उपस्थिती राहणार आहे. 
गत ११ जुनपासून सुरु झालेल्या महोत्सवाचे प्रतिष्ठाचार्य प. पु. सुखसागर समुदायवर्ती शासन प्रभावत खरतर मच्छाचार्य श्री जिनपियुषसागर सुरीश्वरजी म.सा. राहणार आहे. त्यांच्याच प्रेरणेने या देवालयाचा जिर्णोद्धार झाला. सोबतच या कामात सिहोरी येथील शासनरत्न मनोजकुमार बाबुमलजी हरण यांचे कुशल मार्गदर्शन मिळाले. धनज बु. स्थित श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाव्दारा याबाबत सांगण्यात आले की, वाशिम जिल्ह्यातील धनज बु. येथे शेकडो वर्षापूूर्वी त्यांचे पूर्वज व्यापार करण्यासाठी आले होते. येथे अनेक वर्षापूूर्वी ८०० वर्ष पुरातन श्री पार्श्वनाथ सहचंद्र प्रभू स्वामींची प्रतिमा स्थापन करण्यात आली. येथेच आचार्य हेमचंद्र सुदेश्वरजी म.सा. यांनी सोमचंद्रजी म.सा. यांना आचार्यपद प्रदान केले. ज्या ठिकाणी आचार्य श्री सोमचंद विराजमान झाले; त्या ठिकाणीच श्री संघाने मंदिराचे निर्माण कार्य करुन धर्मनिष्ठ रुपचंद्र बोथरा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून जैन साधू व साध्वीगणांची येथे ये-जा असते. मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम खरतर गच्छीय जिर्णोध्दाराचे काम खरतर गच्छी आचार्य श्री जिनपियुषसागर सुरीश्वरजी म.सा.यांच्या प्रेरणेने सुरु करण्यात आले. आता त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु आहे. शासनरत्न मनोजकुमार बाबुमलजी हरण यांच्या मार्गदर्शनात १८ जून २०१८ चा शुभदिन अष्ठान्हिका महोत्सवपूर्वक प्रतिष्ठा  करण्यासाठी  निश्चित करण्यात आला. महोत्सवाच्या सातव्या दिवशी १७ जूनला सकाळी ८ वाजता भव्याती भव्य वरघोडाचे आयोजन करण्यात येईल. सोबतच दिक्षा कल्याणकाची रथयात्रा, अंजना शलाका महाविधान, केवलज्ञान कल्याणक, निर्वाण कल्याणक मध्यरात्री अभिव्यसना, अंजनविधीचे आयोजन होईल. विजय मुहुर्तात ६०८ जोडपे पार्श्व भैरव महापुजन करणार आहेत. १८ तारखेला व्दारोद्घाटन करण्यात येईल. सकाळी ८ वाजता युगप्रधान दादा गुरुदेवाचे पुजन करतांना मुहूर्तावर बोलीव्दारा आदेश लावून ७० भेदी पुजन करण्यात येईल. या प्रतिष्ठा महोत्सवात सकल जैन समाजाचे अध्यक्ष तसेच माजी खासदार विजयबाबू दर्डा, अजय संचेती, अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार डॉ. सुनिल देशमुख, आमदार रवि राणा, म्हाडाचे माजी अध्यक्ष देवराज बोथरा, श्री जैन श्वेतांबर बडा मंदिराचे अध्यक्ष नगीनचंद बुच्चा, प्रेमबाबु लुनावत, श्री नाकोडा मंडळाचे अध्यक्ष जसवंतराज लुनिया, श्री दादावाडी संस्थानचे अध्यक्ष भरत खजांची, श्रीचंद्रप्रभु जैन मंदिराचे अध्यक्ष गिरधारीलाल कोचत, कांताबेन नवीनभाई शहा, इंदूबेन जयंतीभाई शहा, श्री जैन श्वेतांबर मंडळाचे अध्यक्ष निर्दोश पुगलिया, श्री वर्धमान नगर जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष गणेश जैन, निखिलभाई कुसूमगर, निखिलभाई कुसुमगर, अजितनाथ जैन, श्वेतांबर मंदिर नागपुरचे अध्यक्ष ऋषभ कोचर, श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ तिर्थ शिरपूरचे अध्यक्ष दिलीपभाई शहा, आदिश्वर श्वेतांबर जैन मंदिर कारंजाचे अध्यक्ष विजयकुमार लोढाया, बिरदीचंद  चोरडीया, सुभाष भंडारी (नागपूर), सुरेश पारख नागपूर, सुरेश पारख नागपूर, प्रसन्न दप्तरी यवतमाळ, शांतीलाल बरडिया कारंजा लाड तथा श्वेतांबर जैन सेवासंघ औरंगाबादचे अध्यक्ष सुरेश झाबक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेलिकॉप्टरने होणार पुष्पवर्षाव 
धनज बु. येथे अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सवांतर्गत देवालयाच्या भव्याती भव्य शलाका व प्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाव केला जाणार आहे. प्रतिष्ठा महोत्सवासाठी येणाºया पाहुण्यांच्या सोईसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. श्वेतांबर मूर्तीपुजक संघाच्यावतीने सर्व समाजबांधवांनी या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

विविध कार्यक्रम उत्साहात !
११ जूनपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. ११ जूनला कुंभ स्थापना, दीपक स्थापना, ज्वारारोपण, वेदीचे पूजन, पंच कल्याणक करताना भोजन शाळा व नगरीचे उद्घाटन करण्यात आले. १२ जून रोजी नवग्रह पूजन दशदिगपाल पूजन, श्री अष्टमंगल पूजन, १३ जूनला श्री विसस्थापन पूजन, श्री लघुसिध्दचक्र पूजन १६, विद्यादेवी पूजन व नव्याणु प्रकारी पूजन करण्यात आले. १४ जूनला इंद्र इंद्र्राणी माता, प्रतिष्ठाचार्य व धर्माचार्याची स्थापना करण्यात आली, तसेच च्यवन कल्याणक, १४ स्वप्न दर्शन, शुक्रस्तव, स्वप्न फल  कथन व १२ व्रत पूजन झाले. 

Web Title: Grand Anjana Shalaka Prestige Festival on June 18 at Dhananjay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम