शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:31+5:302021-07-24T04:24:31+5:30
------------------ सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी वाशिम: सर्दी, खोकला, आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून मानोरा तालुका ...
------------------
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम: सर्दी, खोकला, आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून मानोरा तालुका आरोग्य विभागाने परिसरात मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने गुरुवारी रुग्णांची आरोग्य तपासणी केली.
------------------
काजळेश्वर परिसरात पाऊस
वाशिम: कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरात गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला असून. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेती कामे मात्र खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-----
पीककर्ज वाटप संंथ
वाशिम: खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असतानाही धनज बु. परिसरातील बँकांत पीककर्ज वाटपाचा वेग संथ आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकºयांना अडचणी येत असून तातडीने पीककर्ज वाटप करणे आवश्यक ठरत आहे.
------------------
ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
वाशिम: उंबर्डा बाजार येथे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिवांनी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम: वाहतूक नियमांच्या उल्लंघन करणाऱ्यावर नियंत्रणासाठी कारंजा- मानोरा मार्गावर दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत सोमठाणा चेकपोस्ट पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी गुरुवारी केली.
------