आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:29+5:302021-01-08T06:11:29+5:30
कामरगाव चौकीत पोलिसांची संख्या अपुरी कामरगाव : येथील पोलीस चौकी अंतर्गत परिसरातील १५पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या ...
कामरगाव चौकीत पोलिसांची संख्या अपुरी
कामरगाव : येथील पोलीस चौकी अंतर्गत परिसरातील १५पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कामरगाव चौकीत कार्यरत पोलीस कर्मचारऱ्यांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.
^^^^^^^
पाण्याचा अपव्यय
शिरपूर : रिसोड शहराला अडोळ येथील प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या व्हॉल्व्हला ढोरखेडा गावादरम्यान गळती लागल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यामुळे पुढे प्रकल्पाची पातळी खालावून पाणी समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी रिसोड नगर परिषदेकडे करण्यात आली आहे.
-----
वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
आसेगाव : मास्क न लावणाऱ्यांसह डबलसीट दुचाकीवर गेल्या आठवडाभरापासून पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यात सोमवारी मंगरूळपीर-वाशिम मार्गावर दुपारी विनामास्क आणि विनाकागदपत्रे वाहन चालविणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. दुचाकी आणि चारचाकीसह ऑटोरिक्षाचालकांचा यात समावेश होता.
------
वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची प्रतीक्षा
मेडशी : कोरोना संसर्गामुळे अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यात मेडशी जिल्हा परिषद गटातील चार ते पाच शाळेच्या काही वर्गखोल्या नादुरुस्त असून, दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला असल्याने पुढील सत्रापूर्वी वर्गखोल्यांची दुरुस्ती तातडीने करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
----------------
आरोग्यवर्धिनी केंद्राला झुडपांचा विळखा
उंबर्डा बाजार : येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या आवारात गाजरगवतासह झुडपे वाढली आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची आणि सरपटणाऱ्या जिवांचा संचार वाढण्याचीही भीती आहे. या पृष्ठभूमीवर परिसरातील झुडपे आणि गाजरगवत निर्मूलन करण्यासाठी डॉ. एस.आर. नांदे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.