‘हर्र्र.बोला महादेव’च्या गजराने नगरी दुमदुमली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:04 AM2017-08-15T01:04:48+5:302017-08-15T01:05:27+5:30
वाशिम : वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावडमंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर्र.बोला महादेवाचा’ गजर दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावडमंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर्र.बोला महादेवाचा’ गजर दिसून आला.
वाशिम शहरामध्ये तिर्थक्षेत्र काशिनंतर सर्वात जास्त महादेवाचे मंदिरे आहेत असे ‘वत्सगुल्म महात्म्य ’ यामध्ये म्हटले आहे. येथे शिवभाविकांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने येथे दरवर्षी कावड मंडळाच्यावतिने मिरवणुक काढून शिवलींगास अभिषेक , पुजा अर्चा तसेच शिवाच्या पवित्र तिर्थस्थळावरुन आणलेले तिर्थाचे पूजन केल्या जाते. o्रावणमासात शिवजींच्या मंदिरात मोठया प्रमाणात गर्दी दिसून येते. १४ ऑगस्ट रोजी o्रावणमासातील चवथा सोमवार असल्याने यानिमित्त कावड मंडळाच्यावतिने शहरातून मिरवणुक काढण्यात आली. कावड मंडळाची मिरवणूक सकाळपासूनच शहरातून निघून एका ठिकाणी जण्यास सुरुवात झाली होती. यावेळी विविध भाविकांच्यावतिने कावड मंडळाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांचे स्वागतासाठी कमानी उभारण्यात येवून त्यांच्या चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास ३५ कावड मंडळातील शेकडो भाविकांनी काढलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. शहरातील मन्नासिंह चौक, गाभणे गल्ली, राजनी चौक, नगरपरिषद चौक, दंडे चौक, गणेशपेठ, टिळक चौकासह शहरातील मार्गांवर महिलांनी सडा सारवण करुन रांगोळी घातलेली आढळून आली. मिरवणूक शांततेत आटोपली.