०००००
नवीन रेशन कार्डवर धान्य मिळेना !
वाशिम : रिसोड तालु्क्यातील नवीन रेशनकार्डधारकांना अद्याप स्वस्त धान्याचा पुरवठा सुरू झाला नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
००
आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत आरोग्य विभागातर्फे सोमवारी कवठा परिसरात मार्गदर्शन करण्यात आले.
००
मेडशी चेक पोस्टनजीक वाहन तपासणी
वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडशी पोलीस चौकीसमोर चेक पोस्टची सुविधा असून, मंगळवारी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा कसून तपास करण्यात आला. ई-पास नसणाऱ्यांना परत पाठविण्यात येत आहे.
००
रोहयो कामासाठी नोंदणी करा !
वाशिम : रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे उपलब्ध होण्यासाठी मजुरांची नोंदणी आवश्यक आहे. रोजगारासाठी मजुरांनी ग्रामपंचायतकडे नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
००
खड्ड्यांमुळे चालकांची गैरसोय
वाशिम : वाशिम शहरातील सिव्हील लाईन परिसरातील कोविड केअर सेंटरजवळील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सिव्हील लाईनकडून जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गाकडे वळणाच्या ठिकाणीच खड्डे असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अद्यापही खड्डे बुजविण्यात आले नाहीत.
००
मानधनात वाढ करण्याची मागणी
वाशिम : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निराधार, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली.
००
रस्ता कामास प्रचंड विलंब
वाशिम : रिसोड तालुक्यातील शेलुखडसे, पिंपरखेड ते जिल्हा सीमेपर्यंत असलेल्या रस्ता कामास प्रचंड विलंब होत असून, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी सोमवारी केली.
००
आधारनोंदणी प्रभावित
वाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून, यामधून अंगणवाडी केंद्रातील आधार नोंदणीही सुटू शकली नाही. मालेगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी प्रभावित झाली.
०
घरकुलाचे अनुदान लांबणीवर!
वाशिम : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही कवठा, हराळ, केनवड, तामशी, अडोळी आदी जिल्हा परिषद गटातील जवळपास २५० लाभार्थींना दीड वर्षानंतरही अनुदान मिळाले नाही. आता कोरोनामुळे अनुदान आणखी लांबणीवर पडले आहे.
०००००
विनामास्क आढळून आल्याने कारवाई
वाशिम : दुचाकीवर विनामास्क आढळून येणाऱ्या ३६ जणांवर मालेगाव वाहतूक शाखेने मंगळवारी कारवाई केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहनचालकांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना दिलेल्या आहेत.
०
शिरपूर आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी पुरेस मनुष्यबळ नसल्याने रिक्त पदे भरण्यात यावे, अशी मागणी होत आहे.