आरोग्य विभागाची सतर्कता; लसीचा डोस वाया गेला नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:40 AM2021-01-20T04:40:24+5:302021-01-20T04:40:24+5:30
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी ...
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात तीन केंद्रांत लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून, पहिल्यादिवशी १६७ जणांना लस दिली. लस वाया जाणार नाही, याची दक्षता घेतल्याने लस वाया गेली नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी सांगितले.
००
घाबरू नका
कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षित असून, लस दिल्यानंतर काही ठिकाणी साैम्य लक्षणे दिसून येतात. वाशिम जिल्ह्यात अद्याप हा प्रकार घडला नाही.
जोखीम गटातील कर्मचाऱ्यांनाही लस दिली असून, यापासून कोणताही त्रास जाणवला नाही, असे लाभार्थींनी सांगितले. कोरोना लस सुरक्षित असून, घाबरू नका, असे आवाहन केले.
०००
एका बाटलीत १० डोस
लसीच्या एका बाटलीतून दहाजणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानाही काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्ट जातात.
०००
जिल्ह्याला किती डोस मिळाले? ६५००
पहिल्यादिवशी किती जणांना दिले? १६७
कितीजण अनुपस्थित राहिले? १३३
किती डोस वाया? ०००