पद्मतिर्थ तलावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:23 PM2019-06-23T16:23:28+5:302019-06-23T16:28:40+5:30

वाशिम : वाशिम शहरातील ऐतिहासिक महत्त्व जपून असलेल्या पद्मतिर्थ तलावाची स्वच्छता करण्यासाठी श्रमदानाकरीता शेकडो हात पुढे येत आहेत.

Hundreds of Hands come forward for the cleanliness of the Padmirth lake | पद्मतिर्थ तलावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

पद्मतिर्थ तलावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील पौराणिक महत्त्व प्राप्त असलेल्या पद्मतिर्थ तलावाची रविवार, २३ जून रोजी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली. त्यास शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाकरिता मी वाशिमकर हा सामाजिक ग्रूप आणि वाशिम नगर परिषदेला सेवा पुरविणाºया कनक रिसोर्स मॅनेजमेंटच्या चमूने विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आले. 
वाशिम शहरातील पद्मतिर्थ तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्यावर्षी मी वाशिमकर ग्रूप आणि शहरांमधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला होता. त्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेत वाढ झाली. यावर्षीदेखील पद्मतिर्थ तलावाची साफसफाई व स्वच्छता करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार, २३ जून रोजी सकाळपासूनच पद्मतिर्थ तलावावर श्रमदान करण्यासाठी शहरातील नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी संपूर्ण तलावातील केरकचरा स्वच्छ करण्यासोबतच कुंडाचीही साफसफाई करण्यात आली.
वाशिम शहराला ऐतिहासिक महत्त्व असून,या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. पद्मतिर्थ तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्या वर्षी मी वाशिमकर ग्रूप आणि शहरवासियांच्या सहकार्यातून या तलावातील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेत वाढ झाली. यावर्षीदेखील पद्मतिर्थ तलावाची साफसफाई व स्वच्छता करण्याचा संकल्प मी वाशिमकर ग्रूपने केला आहे.  रविवार, २३ जून रोजी पद्मतिर्थ तलावाची स्वच्छता करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. एका दिवसात संपूर्ण तलावाची स्वच्छता करण्याचा संकल्प असून, श्रमदानासाठी कॉर्नर बैठका, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. पद्मतिर्थ तलावाच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
ऐतिहासिक वास्तुचे जतन करण्याचा प्रयत्न
वाशिम शहर अर्थात वत्सगुल्म नगरी आपले ऐतिहासिक महत्त्व जपून आहे. वत्सगुल्म नगरीतील प्राचिन व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी खरे तर पुरातत्व विभागाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, पुरातत्व विभागाकडून म्हणावे तसे प्रयत्न होत नसल्याने शेवटी नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. मी वाशिमकर ग्रूपने पद्मतिर्थ तलाव या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

Web Title: Hundreds of Hands come forward for the cleanliness of the Padmirth lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.