उन्हाळ्यात चिमुकल्यांनी बनविले शेकडो ‘सिड्सबाॅल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 12:12 PM2021-06-03T12:12:40+5:302021-06-03T12:12:59+5:30
Washim News : वाशिम आसपासच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ओसाड जमिनीवर देशी सिड्स बाॅल फेकण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम : घरच्या घरी बीजगोळे निर्मितीचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था,वाशिम व शासकीय सदस्य अंतग॔त तक्रार समिती, सामाजिक वनीकरण विभाग, वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांच्या सहयोगाने उन्हाळाभर घरात राहुन चिमुकल्यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. या उपक्रमाव्दारे चिमुकल्यांनी माेठ्या प्रमाणात सिड्सबाॅल तयार केले आहेत.
जमिनीतली पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. एवढेच नव्हे तर रस्ते नवनिर्मितीच्या कामामुळे लाखो वृक्षाची कटाई करण्यात आली. यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे. याकरिता बिजांचे गोळे तयार करून ते आसपासच्या परिसरात फेकले तर आनंद, मजा आणि पिकनिकही होईल आणि धरतीही फळफळेल सोबतचसारख्या मोबाइलच्या अतिवापराच्या दुनियेतून चिमुकली मातीशी पर्यायाने पर्यावरणाशी जोडली जातील या हेतूने संपूर्ण नकोश्या असलेल्या उन्हाळ्यात सदुपयोग व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात चिमुकल्यांनी प्रत्येकी शंभर बीजगोळे म्हणजे ‘सीडबॉल्स’ तयार केले असून पावसाळा सुरू होताच वनहद्दीत सिड्सबाॅल राजरत्न संस्थेकडून फेकले जाणार आहेत.
वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांनी चिमुकल्यांना सिड्सबाॅल प्रशिक्षण देऊन सातत्याने बीजबाॅल निर्मिती करून घेतली. ज्यामध्ये चंदन, निंब, वड, पिंपळ, आंबा या सारख्या देशी वृक्षाचा समावेश आहे. परदेशी वृक्षावर आपल्याकडील पक्षी बसत नसल्याने व ते वृक्ष येथील मातीस पोषक नसल्याने देशी वृक्षलागवड, जतन संवर्धनावर पर्यावरणवाद्यानी भर द्यावा, असे आवाहन यावेळी वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांनी केले.
वाशिम आसपासच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ओसाड जमिनीवर देशी सिड्स बाॅल फेकण्यात येणार आहेत. मातीशी मनमुराद खेळत लाॅकडाऊनचा फायदा घेत घरात राहून चिमुकल्यांनी तब्बल पाचशे बीजबाॅलची निर्मिती केली. यामध्ये विधी मेश्राम, आरती नागूलकर, श्रेयस काळबांडे, ज्ञानेश्वरी नागूलकर या चिमुकल्यांचा समावेश होता.
अशी झाली 'सीडबॉल्स निर्मीती
'सीडबॉल्स' तयार करण्यासाठी माती, शेण, खत व देशी बियाणे वापरले गेले. एक दिवस आधी बियाण्यांना धुवून त्यांना स्वच्छ पुसले गेले. कोरडे करुन त्याला खत व शेणाच्या मिश्रणात मिसळून त्याचे गोळे चिमुकल्यांनी तयार केले. 'सीडबॉल'मध्ये पोषक मुल्ये असल्यामुळे जमिनीत रुजेपर्यंत ते तग धरू शकतील यामधुन उगवलेले अंकुर भविष्यात महाकाय वृक्षात परिवर्तीत होऊन पर्यावरण अबाधित राखण्यासाठी मदत होईल.